शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील श्री साईबाबा मंदिरात साईबाबांच्या दर्शनाविषयी एक महत्त्वाचे वृत्त आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल जाधव यांनी यासंदर्भात एक महत्त्वाचे आदेश काढून भाविकांना मोठा दिलासा दिला आहे.
सीईओ राहुल जाधव यांनी काढलेल्या आदेशामुळे साईबाबांचे व्हिआयपी दर्शन घडवून देणाऱ्या बोगस पीए आणि एजंटाना चाप बसणार आहे. आजी-माजी आमदार, खासदार तसेच विश्वस्तांच्या पीएंना मंदिर परिसरात आता नो एन्ट्री असणार आहे. दररोज व्हिआयपी दर्शन घडवण्यासाठी मंदिर परिसरात अनेकांची लगबग असते. त्यात बोगस बीए आणि एजंटांचा सुळसुळाट असतो. यापुढे आजी-माजी मंत्री , आमदार, खासदार आणि विश्वस्तांच्या अधिकृत स्विय सहाय्यकाकडून संस्थानला पत्र द्यावे लागणार आहे. या निर्णयामुळे साईभक्तांची लूट थांबणार आहे. भाविकांची व्हिआयपी दर्शनाच्या नावाखाली सतत आर्थिक लूट होते. तसेच, प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचा गैरवापरही सर्रास केला जातो. तेही यामुळे थांबणार आहे. व्हिआयपी दर्शन घडवणाऱ्या संस्थान कर्मचाऱ्यांवरही यापुढे कठोर कारवाई होणार आहे.
Shirdi Sai Baba Darshan CEO Order Devotees Relief