शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांनी आज येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दिवाळीचा सण सध्या सुरू आहे. त्यातच आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. याचनिमित्ताने अनंत अंबानी यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
शिर्डी साई बाबा मंदिर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी अनंत अंबानी यांचे स्वागत केले. ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांचे अनंत हे सुपुत्र आहेत. तसेच, रिलायन्स उद्योग समुहाचे पुढील वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. साईबाबांच्या मध्यान्ह आरतीवेळी अंबानी मंदिरात हे उपस्थित होते. यापूर्वी ते दर्शनासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले. पण, काही कारणाने ते आले नव्हते. आज दिवाळीच्या सणात त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. अंबानी यांनी १ कोटी ५१ लाख रुपयांची देणगी संस्थानला दिली आहे. बाणायत यांच्याकडे ही देणगी अंबानी यांनी दिली आहे.
Shirdi Sai Baba Darshan Anant Ambani