शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केवळ भारतातून नव्हे तर शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात, मात्र त्याच शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री अचानक अनेक हॉटेलवर छापे टाकले. यामध्ये १५ तरुणींची सुटका करण्यात आली असून ११ आरोपींनी अटक करण्यात आली. भाविकांच्या निवासाची सोय म्हणून चालविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हॉटेलमध्ये हे प्रकार सुरू होते. पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच, अनेकांनी घाईघाईने हॉटेल बंद केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शिर्डी येथील तब्बल सहा बड्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाई सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. हॉटेलमधून १५ पिडित मुलींची सुटका करण्यात आली असून, ११ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री केली. कारण शिर्डी शहर व परिसरातील काही हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती उप अधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती.
सदर माहितीच्या अधारे पोलिसांच्या पथकाने शिर्डी येथे जावून या बड्या हॉटेलमध्ये छापे टाकत कडक कारवाई केली. आरोपीविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलद विमानसेवा आणि रस्ते वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्याने भाविक पुर्वीसारखे मुक्कामाला थांबत नाहीत. शिर्डीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत आल्याचे म्हटले जाते. मात्र आता दुसरीकडे याच हॉटेलमध्ये असे अवैध धंदे सुरू आल्याचे उघड झाले आहे.
सुमारे चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे शिर्डीत उघड झाले होते, वारंवार असे प्रकार घडूनही पोलिसांकडून येथे कारवाई होत नाही. त्यामुळे असे व्यवसाय वाढत आहेत. असे नागरिकांचे म्हणणे आहे मात्र आता केलेल्या कारवाईमुळे समाधान देखील व्यक्त होत आहे.
Shirdi High Profile Sex Racket Burst by Police