शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत महत्वाचे वृत्त आहे. साईबाबांसाठी जगभरात ख्यात असलेल्या शिर्डीच्या कनेक्टिव्हिटीबाबत अतिशय महत्वपूर्ण बाबी सध्या घडत आहेत. शिर्डी हे समृद्धी महामार्गामुळे पायाभूत सुविधांच्या नकाशावर आले आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई-शिर्डी या वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ केला आहे. आणि आता केंद्र सरकारने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाईट लँडिंगची परवानगी दिली आहे.
सद्यस्थितीत शिर्डी विमानतळावरुन १३ विमानसेवा दिल्या जात आहेत. आता नाईट लँडिंगची परवानगी मिळाल्याने या विमानतळावरील विमानसेवेची संख्या झपाट्याने वाढणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. त्यांनी यासंदर्भात अतिशय आनंद व्यक्त केला आहे. हवाई वाहतूक संचालनालयाने आज शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाईट लँडिंगची परावनगी मंजूर केली आहे. याबद्दल फडणवीस यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तसेच, माझ्या नेतृत्वात शिर्डीला ग्रीनफील्ड विमानतळाचे कामकाज सुरू झाले. आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिर्डी वेगाने प्रगती करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1626162408694898688?s=20
Shirdi Connectivity Samruddhi Highway Vande Bharat Train Airport Permission
Nigh Landing