शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३५४ च्या दाखल गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी व त्यांचेवर तडीपार व एम.पी.डी.ए. अन्वये कारवाई न करण्यासाठी एक ते दीड लाखाची मागणी करुन तडजोडीअंत ३० हजार रुपये लाच घेण्याची तयारी दर्शवल्यामुळे शिर्डी येथील पोलिस हवालदार संदीप गडाख लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी गडाख याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस निरीक्षक दुधळ यांच्यासाठी ही लाचेची मागणी गडाख यांनी केली होती. या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे विरुद्ध शिर्डी पोलिस स्टेशन दाखल असलेल्या भा.द. वि. कलम ३५४ च्या गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी व त्यांचेवर तडीपार व एम.पी.डी.ए. अन्वये कारवाई न करण्यासाठी ही लाचेची मागणी १५ जून रोजी पंचासमक्ष पोलिस हवालदार गडाख यांनी पोलिस निरीक्षक दुधळ यांचेसाठी केली होती. सुरुवातील एक ते दीड लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ३० हजार रुपये स्विकारणची तयारी दर्शविली. त्यानंतर २६ जुलै रोजी आलोसे गडाख यांनी पो. नि. दुधळ यांचेसाठी एक लाख रूपये लाचेची मागणी करून स्विकारणची तयारी दर्शविली. त्यामुळे गडाख यांचे विरुद्ध भ्र. प्र.अधि.1988 चे कलम ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचेची मागणी कारवाई
सापळा अधिकारी–
वैशाली पाटिल, पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.न. 7722000949.
सापळा पथक-
पो. ना. शरद हेम्बाडे,
पो. ना. राजेंद्र गिते, चा पोना. परशुराम जाधव
मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय , ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक- 02532578230,
टोल फ्री क्रमांक १०६४ .
Shirdi ACB Trap Bribe Corruption Police Crime