शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील शहर वाहतूक शाखेचा लाचखोर पोलिस नाईक प्रकाश दशरथ पिलोरे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. नगरसूल येथील एका व्यक्तीची प्रवासी वाहने सुरू ठेवण्यासाठी पिलोरे याने ३५०० रुपयांची लाच घेतली. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, नगरसूल येथील एका व्यक्तीची तीन प्रवासी वाहने आहेत. नगरसूल ते शिर्डी या मार्गावर ही वाहने सुरळीतपणे सुरू राहू द्यावीत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करु नये यासाठी लाचखोर पिलोरे याने ३५०० रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने शहानिशा केली आणि सापळा रचला. अखेर एसीबीच्या पथकासमोर पिलोरे याने ३५०० रुपयांची लाच स्विकारली. त्यामुळे त्याला रंगेहात पकडण्यात आले. आता त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Shirdi ACB Raid Trap Bribe Corruption