नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे गाव परिसरात येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. याठिकाणी आरोग्य विभागाच्या शिफारसी नुसार राज्य सरकारने ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले असून आमदार सरोज आहिरेंच्या प्रयत्नाला यश आले आहे. कोरोना काळात रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी लहवित, सैय्यद पिंप्री व शिंदे-पळसे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली होती, सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या व विभागाच्या प्रस्तावानुसार राज्य शासनाने गुरुवारी (दि.१७) रोजी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयतामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंजूर दिली आहे. देवळालीच्या आमदार आहिरेंच्या प्रयत्नांना यश आले असून नाशिकसह सिन्नर, निफाड तालुक्यातील रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. यापुर्वी वैद्यकिय अधिकारी माधव आहिरे असतांना शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्राला विभागीय आनंदीबाई जोशी पुरस्कार प्राप्त झाला होता,