नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाच्यावतीने आता अतिशय आक्रमकपणे नियुक्त्या जाहीर केल्या जात आहेत. जिल्हाप्रमुख,महानगर प्रमुख आणि महिला आघाडी प्रमुख पाठोपाठ आता संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील विविध पदावर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हळूहळू जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व वाढत आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी ग्रामिण युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी सदानंद नवले तर त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्षपदी रवि वारुंगसे यांची नियुक्ती केली आहे.
त्र्यंबकेश्वर -झ्गतपुरी तालुक्यातील सेनेचे तालुकाध्यक्ष रवि वारूंगसे,गोटीराम करंडे,देवराम भस्मे,मनोहर महाले,अंकुश परदेशी,अक्षय बांगरे यांनी तर नाशिक तालुक्यातील सदानंद नवले आणि शंकर खांडबहाले या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांना नियुक्तीपत्र दिले.रवि वारूगंसे यांची शिंदे गटाच्या त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुखपदी,गोटीराम करंडे यांची इगतपुरी -त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या युवा सेनेच्या प्रमुखपदी,मनोहर धोंडगे यांची उप जिल्हाप्रमुखपदी अंकुश परदेशी यांची युवा सेना संघटकपदी तर अक्षय बांगरे यांची त्र्यंबकेश्वर युवा सेनेच्या शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदानंद नवले यांच्यावर सिन्नर,इगतपुरी,नाशिक या तीन तालुक्याची युवा सेनेचे जबाबदारी निश्चित करण्यात आली असून त्यांची युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी तर शंकर खांडबहाले यांची नासिक तालुका युवा सेनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.वंजारवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, हिरामण भगत यांनीही प्रवेश केला.यावेळी पक्षाचे सचिव सचिन माशेलकर,जंयत साठे,जिल्हाप्रमुख अनिल ढिकले,माजी आमदार काशिनाथ मेंगाळ,त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे भुषणभाऊ अडसरे आदी मान्यंवर उपस्थित होते.
Shinde Group Nashik District Appointments