मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या तीन महिन्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते व पदाधिकारी विरुद्ध शिंदे गटाचे खासदार, आमदार व विविध नेते यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. याला कारण म्हणजे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांनी थेट उद्धव ठाकरे तसेच मातोश्रीवर अतिशय गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे हे मातोश्रीवर दर महिन्याला १०० कोटींचे खोके घेऊन जात होते, असा खळबळजनक आरोप जाधवांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एकीकडे शिंदे गट आणि शिवसेनेचा दसरा मेळावा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना आता दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोपांचा सामना चांगलाच रंगला आहे. शिवसेनेला दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली असून शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होणार आहे. त्याआधी शिंदे गटाने मेळाव्याचे दोन टीझर जारी केले यात उध्दव ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचे संदर्भ देऊन टिका केली जात आहे. त्याला प्रत्योत्तर देत शिवसेनेनेही एक टीझर जारी केला आहे.
मुंबईत हे टीझर वॉर सुरू असताना दुसरीकडे विदर्भात शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. राज्यातील अनेक भागातून मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये नेले जात होते. विशेष म्हणजे सचिन वाझे हेच मातोश्रीवर पैशांचे खोके घेऊन जात होते, असा दावा खासदार जाधव यांनी केला आहे. अशा प्रकारे गंभीर आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपुर्वीच राज्यात विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पहिल्यांदाच बुलढाणा शहरात आले, त्यापुर्वी खासदार जाधव समर्थकांनी पाटील यांचे मेहकरमध्ये रॅली काढून जंगी स्वागत केले. गुलाबराव पाटील हे वादग्रस्त वक्तव्य बद्दल आधीच प्रसिद्ध आहे ते दररोज काही ना काही नवीन उद्धव ठाकरे यांच्या गटावर करीत असतात त्यातच आता पाटील यांच्या उपस्थितीतच हिंदू गर्वगर्जना या कार्यक्रमामध्ये खासदार जाधवांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर टीका केली आहे.
खासदार जाधव म्हणाले की, आम्हाला चांगले माहीत आहे की मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये नेले जात होते, यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. यावेळी खासदार जाधव यांचे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकारी निष्ठेने काम करत आहोत. त्यामुळे कोणी ५० खोक्यांचा आरोप करू नये, या उलट तुमच्याकडेच १०० खोके जात होते त्याचे काय? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. आता त्यांच्या या आरोपाला शिवसेना उद्धव गटाचे नेते काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shinde Group MP Big Statement about Matoshri