मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर कायमच वादांमुळे चर्चेत असतात. आता प्राचार्यांना केलेल्या मारहाणीमुळे ते चर्चेत आले आहेत. हिंगोली शहरालगतच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर यांनी शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसते आहे. बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण केली. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वीची असल्याचे बोलले जात आहे. आमदार बांगर यांच्याकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
प्राचार्यांना मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. घटना उघडकीस आल्यापासून सर्वासामान्यांमधून संतप्त भावना उमटत आहेत. कायदेमंडळात बसून कायदे तयार करणारेच बाहेर कायदे कसे पायदळी तुडवतात याचे हे उत्तम उदाहरण असल्याची प्रतिक्रियाही उमटली आहे.
नागरिकांनी अडविला होता ताफा
8 जानेवारीला हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई इथल्या मसाई मातेची यात्रा आयोजित करण्यात आली होती. प्रथेप्रमाणे या यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना बोलावले जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा पाहता जिल्ह्यातील राजकीय पुढारी देखील या यात्रेला जाण्यासाठी टाळतात. पण, आमदार बांगर तिथे पोहोचले. मात्र त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला होता.
वाद आणि आमदार बांगर ठरले समीकरण
आमदार बांगर आणि वाद हे समीकरणच ठरले आहे. ते सतत वादातच असतात. शिवसेनेतील बंडांनंतर 26 जून 2022 रोजी त्यांनी शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांची मुलं अविवाहित मरतील असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. 17 जुलै 2022 रोजी गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा, हे त्यांचे वक्तव्य पुन्हा वादग्रस्त ठरले. 15 ऑगस्ट 2022 रोजी माध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या गोडाऊन व्यवस्थापकाला मारहाणीचा आरोप. 14 ऑक्टोबर 2022 रोजी विमान कंपनी कार्यालयात तोडफोड, कृषी अधिकाऱ्याला धमकावले. 27 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाला.
ये हैं शिंदे गुट के विधायक @santoshbangar_ जिनकी हमेशा गुंडागर्दी करने के कारनामे सामने आते रहते हैं। अब एक सरकारी कॉलेज में जाकर इन्होंने प्राचार्य को ही पीट दिया। वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो चुका है। @mieknathshinde @Dev_Fadnavis @HingoliSp @ShivSena @AUThackeray pic.twitter.com/HrThQ9wvbr
— Diwakar Singh (@Diwakar_singh31) January 25, 2023
Shinde Group MLA Santosh Bangar Video Viral