मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सोलापूरच्या तुळजा भवानी देवीला तब्बल ७५ तोळे सोने अर्पण केले आहे. सरनाईक यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. तब्बल ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने सरनाईक कुटुंबियांनी देवीच्या चरणी अर्पण केले आहेत. आपल्या पत्नीने केलेला नवस पूर्ण झाल्याने दागिने अर्पण केल्याचे सरनाईक यांनी सांगितले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सरनाईक यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटिस आली होती. त्यानंतर त्यांची चौकशीही करण्यात आली. त्यानंतर राज्यामध्ये सत्तांतर झाले. सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सरनाईक यांची चौकशी थांबली आहे. शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्याला ९०० खोके दिल्याचा खुलासा नुकताच सरनाईक यांनी केला होता. आणि आता त्यांनी तब्बल ७५ तोळे सोने देवीला अर्पण केल्याचे समोर आले आहे.
Shinde Group MLA Donate 75 Gram Gold in Temple