मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे ५० आमदार तसेच १२ खासदार गुवाहाटीला जाणार असून, हे आमदार – खासदार कामाख्या देवीचं दर्शन तिथे घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, यातील बरेच आमदार आणि खासदार गुवाहाटीला जाणार नसल्याचे आता समोर येत आहे. यामागे बदनामीची भीती हे कारण असल्याचे समोर येत आहे.
शिंदे गटाचा आज आणि उद्याचा गुवाहाटी दौरा आहे. काही आमदारांनी वैयक्तिक कारण देऊन या दौऱ्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काही मंत्री त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते गुवाहाटीला जाणार नाहीत. तर काही आमदार नाराज असल्याने हा दौरा करत नसल्याची चर्चा आहे. तर काही बदनामीच्या भीतीने जात नसून ढोबळ कारणे पुढे करत असल्याची चर्चा आहे. एकूण तीन मंत्री आणि तीन आमदार या दौऱ्याला जाणार नाहीत. विशेष म्हणजे गुवाहाटी दौऱ्याची तारीख बदलल्यानंतरही या आमदार आणि खासदारांनी या दौऱ्यावर जाणं टाळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही नेत्यांना बदनामीची भीती वाटत आहे तर काहींची शिंदे यांच्यावर नाराजी असल्याने त्यांनी या दौऱ्यापासून दूर राहणं पसंत केलं आहे. तर काहींचे नियोजित कार्यक्रम आणि घरगुती कार्यक्रम आहेत. त्यामुळे या आमदारांनी गुवाहाटीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटीला रवाना
मुख्यमंत्र्यांनी जाताना विमानात वडीलांना बाजूला बसवलंय !
कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला रवाना@mieknathshinde #Guwahati #shindevsthackeray pic.twitter.com/7LNgNaI1MO
— pradip kapase (@pradip_kapase) November 26, 2022
हा दौरा आधी २१ नोव्हेंबर रोजी होणार होता. मात्र, सर्वांच्या सोयीसाठी ही तारीख बदलून २६ नोव्हेंबर करण्यात आली. तरीदेखील काही नेते उत्सुक नाहीत. शिंदे गटाचे आमदार दादा भुसे, आमदार संजय गायकवाड आणि सुहास कांदे दोघेही गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र, शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा नाशिक दौरा अचानक आल्याने ते गुवाहाटीला जाणार नाही अशी माहिती आहे. सत्तार हे गुवाहाटीला जाणार नसल्याने एकच चर्चा रंगली आहे. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील, पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हेही गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा गुवाहाटीला जाणार नाहीत. ते जळगावमध्येच थांबणार आहेत. तर आमदार लताताई सोनवणे या गुवाहाटीला जाणार की नाही हे अद्याप समजलेले नाही.
#Watch | Maharashtra Chief Minister Eknath Shinde and his MLAs on their way to Assam's Guwahati. pic.twitter.com/5ymx7jOSaF
— NDTV (@ndtv) November 26, 2022
मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील गुवाहाटीला जाणार नाहीत. महत्त्वाची कामे आणि लग्न समारंभामुळे ते गुवाहाटीला जाणार नाहीत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज दुपारी २ वाजेपर्यंत पुण्यात आहेत. २७ व २८ तारखेला त्यांच्या परंडा मतदारसंघात आरोग्य शिबीर असल्याने ते गुवाहाटीला जाणार नाहीत. साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा गुवाहाटी दौरा रद्द झाला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणास्तव दौरा रद्द केल्याची आमदार महेश शिंदे यांनी फोनवरून दिली माहिती. शंभूराज देसाई यांच्या घरातील मंगलकार्य असल्याने ते देखील जाणार नाहीत. आमदारांपाठोपाठ काही खासदारही या दौऱ्यावर जाणार नाहीत. शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे गुवाहाटीला जाणार नाहीत. नियोजित कार्यक्रम असल्याने बारणे गुवाहाटीला जाणार नाहीत.
या मंत्री आणि नेत्यांची दांडी
आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, चंद्रकांत पाटील (अपक्ष), लता सोनवणे, महेश शिंदे, संजय गायकवाड, श्रीरंग बारणे (खासदार), शिवाजी आढळराव पाटील (माजी खासदार) हे नेते गुवाहाटीला गेलेले नाहीत.
गुवाहाटी दौऱ्यास जात असताना समवेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सहकारी बांधव व इतर. #shahajibapupatil #sangola #guwahati #balasahebanchi_shivsena pic.twitter.com/7ODQDi3stS
— Shahajibapu Patil – शहाजीबापू पाटील (@ShahajibapuP) November 26, 2022
Shinde Group Guwahati Tour Minister MLA Absent