मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी झाला. यावेळेस शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला, असा आरोपही शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. मात्र, सरवणकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरुन २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.
दादर, प्रभादेवी भागात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, शिंदे आणि शिवसेना या दोघांकडूनही स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या स्वागत कक्षावरुन एकमेकांना डिवचण्यात आलं होतं. एकमेकांविरोधात जोरादर घोषणा देत शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रात्री झालेल्या या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं होतं. यात शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही करावा लागला.
तक्रारीनुसार अखेर दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकूण 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कळाली आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची चौकशी करुन पोलिसांनी त्यांना सोडून दिले. संतोष तेलवणे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता संतोष तेलवणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. खरे तर गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शिंदे आणि शिवसेना या दोघांकडूनही स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या स्वागत कक्षावरुन एकमेकांना डिवचण्यात आलं होतं. एकमेकांविरोधात जोरादर घोषणा देत शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रात्री झालेल्या या वादाचं रुपांतर हाणामारीत झाले. दादर पोलिसांकडून आता या राजकीय राड्याप्रकरणी नेमकी पुढे काय कारवाई केली जाते, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
https://twitter.com/rshukla676/status/1568831248554131456?s=20&t=1OxEW10twHT5vcpFYGCDUw
Shinde Group and Shivsainik Fight 25 Booked 5 Arrested
Mumbai Prabhadevi Crime MLA Sada Sarvankar