मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे सरकारने पहिल्यांदाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डॉ. श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्विकारली आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सचिवपदासाठी कर्तव्यदक्ष आणि चाणाक्ष अधिकाऱ्याची निवड केली आहे. परदेशी हे केंद्रात कार्यरत होते. त्यांना आता राज्यामध्ये बोलविण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी भाऊसाहेब धांगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकर या महापालिकेची निवडणूक होणार आहे. तर, मुंबई महापालिकेचीही निवडणूक होणार असल्याने भाजपने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण अर्थात एमएमआरसीएल वर अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने दूरदृष्टीचा विचार करुनच या नियुक्त्या केल्या असल्याचे सांगितले जात आहे.
Shinde Government IAS Officers Transfer