नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सुधारक बडगुजर यांच्या ऐवजी एखाद्या कामगाराची नियुक्ती केली असती किंवा अन्य नगरसेवकाला संधी दिली असती तर म्युनिसिपल कर्मचारी सेनेवरचा दावा आम्ही सोडला ही असता अशी भूमिका शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी मांडली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, बबनराव घोलप हे वरिष्ठ नेते आहेत. माजी आमदार योगेश बबनराव घोलप यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोजताई अहिरे यांच्या समोर विधानसभेची उमेदवारी करायची तर त्यांनाही महाविकास आघाडी समोर अन्य पक्षात प्रवेश घ्यावा लागू शकतो. बबनराव घोलप, योगेश घोलप हे आमच्या सोबत आले तर त्यांच्या अनुभवाचा पक्ष वाढीसाठी निश्चितच लाभ होईल. त्यामुळेच आम्ही बबनराव घोलप यांना विरोध न करण्याचे ठरविले होते. मात्र, ज्यांच्या मुळे सामान्य सैनिक त्रस्त आहेत, जे आमच्या मागणं पक्षात आले आणि आज हुकूमशाह बनले. त्यांनाच तुम्ही म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्षपद देणे अयोग्य आहे. त्या पदाचा फायदा कामगारांना न मिळता स्वतः साठीच अधिक होण्याचा धोका अधिक आहे. महानगरप्रमुख पद स्वतः कडे असतांना म्युनिसिपल सेनेचे ही अध्यक्षपद स्वतः कडे घेऊन एकाधिकारशाहीचा प्रयत्न होतोय.
घोलप नानांनी अन्य कुणाचा अध्यक्षपदासाठी विचार केल्यास आम्हीही संघटनेवरचा दावा सोडला असता. कारण, आज ना उद्या घोलप नाना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासोबत असतील याची आम्हाला खात्री आहे









