मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता महापालिकांमधील स्विकृत नगरसेवकांच्या संख्येत थेट दुपटीने वाढ करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राजकीय नेत्यांना खुष करणारा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील मोठ्या महापालिकांमध्ये स्विकृत नगरसेवकांची संख्या आता १० एवढी करण्यात आली आहे. म्हणजेच, मोठ्या महापालिकांमध्ये आता १० स्विकृत नगरसेवक असतील.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कल्याण-डोंबिलली यासारख्या मोठ्या महापालिकांमध्ये स्विकृत नगरसेवकांची सख्या १० असणार आहे. तर, ज्या महापालिका लहान आहेत. त्यांच्या एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के स्विकृत नगरसेवक होऊ शकतात. म्हणजेच मोठ्या महापालिकांमध्ये स्विकृत नगरसेवकांची कमाल संख्या १० असणार आहे. तर, लहान महापालिकांमध्ये एकूण संख्येच्या १० टक्के स्विकृत नगरसेवक असतील. या निर्णयामुळे अनेक राजकीय नेत्यांची स्विकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Shinde Fadnavis Government Increase Corporator Figure
Upcoming Election Municipal Corporations
Political Decision