मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. मराठा समाजाचा रोष निर्माण होऊ नये याची दखल सरकारने घेतली आहे. नजिकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ नये याची खबरदारी घेत आता मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.
Shinde Fadanvis Govt Decision For Maratha Reservation