इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (५ ऑगस्ट, शुक्रवार) होणार असल्याची शक्यता आहे. भाजपचे ८ तर शिंदे गटामधील ७ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपकडे अपक्षांसह ११५ आमदार आहेत. शिंदे गटाकडे अपक्षांसह ५० आमदार आहेत. त्यामुळे सुरुवातीला यातील काही मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. गेल्या महिन्याभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून यांना संधी
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
राधाकृष्ण विखे पाटील
बबनराव लोणीकर
प्रवीण दरेकर
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
शिंदे गटाकडून यांना संधी
दादा भुसे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
शंभूराज देसाई
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
संदीपान भुमरे
संजय शिरसाट
अपक्ष गटाकडून यांना संधी
बच्चु कडू
रवी राणा
Shinde Fadanvis Government Cabinet Expansion