इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सातारा येथील मूळ गावी दरे येथे गेलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत दरे गावात येण्याचे कारण सांगितले. त्यांनी याच गावात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी नेहमी गावी येत असतो. मी कॅामन मॅन म्हणून काम केले आहे. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. त्यामुळे मला माझ्या मुळगावी आल्यानंतर एक वेगळा आमंद होतो. आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद मिळतो असेही शिंदे यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय़ पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे घेतील. मी कॅामन मॅन म्हणून काम केले. अडीच वर्षामध्ये भरभरुन काम केले. लोकांनी सुध्दा भरभरुन प्रतिसाद दिला.
काल ताप, आज पत्रकार परिषद
काल शिंदे यांना १०५ डिग्री ताप आला आहे. त्यानंतर ते दिवसभर घराबाहेर पडले नाहीत. पण, आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यानंतर कोणतीच विश्रांती मुख्यमंत्र्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. त्यातच हवामानातही बदल झाला आहे. त्यामुळे त्यांना अगोदर कणकण भासू लागली. त्यानंतर त्यांना ताप आला.