विशेष प्रतिनिधी, मुंबई
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित झाले आहे. तशी माहिती स्वतः शिल्पाने दिली आहे. यासंदर्भात तिने सोशल मिडियात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, गेले दहा दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत खडतर गेले आहेत. प्रारंभी माझे सासऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर मुलगी समिशा, मुलगा विआन, सासू आणि नंतर पती राज कुंद्रा हे सर्व बाधित असल्याचे समोर आले. आम्ही सर्वजण विलगीकरणात आहेत. डॉक्टरचा योग्य तो सल्ला घेत आहोत. सर्वांची तब्ब्येत सुधारते आहे. माझी चाचणी आता निगेटिव्ह आली आहे. मुंबई महापालिकेसह सर्वांचे आभार तिने मानले आहेत.
तिने शेअर केलेली पोस्ट अशी