विशेष प्रतिनिधी, मुंबई :
वादग्रस्त पॉर्नोग्राफी प्रकरणा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला जामीन मिळाला आहे. जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांच्या दंडावर जामीन मंजूर केला. त्यानंतर आता शिल्पाने राज कुंद्राला जामीन मिळाल्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. याआधी कुंद्राने दावा केला होता की, या प्रकरणात त्याला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे. त्यानंतर मात्र राज कुंद्राच्या अटकेने शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या होत्या. पोलिसांनी तिची चौकशीही केली. शिल्पा या सगळ्यातून सावरण्यात प्रयत्न करत होती. तसेच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ती पुन्हा कामावर परतली. आता तिने आपल्या पतीला जामीन मिळाल्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक सकारात्मक पोस्ट शेअर केली असून त्यानंतर असे दिसते की, तिनेही सुटकेचा श्वास घेतला आहे असे दिसते. यात शिल्पाने एका इंद्रधनुष्याच्या चित्रासह लिहिले की, ‘इंद्रधनुष्याचे अस्तित्व हे सिद्ध करते की वाईट वादळानंतरही सुंदर गोष्टी घडू शकतात.’ दरम्यान, तिचा पती तुरुंगात गेल्यानंतर तिने स्वतःला सोशल मीडियापासून आणि टीव्ही कार्यक्रमांपासून दूर ठेवले होते. थोड्या वेळाने ती परत आली. परंतु सध्या ती डान्सिंग रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 3’ मध्ये जज म्हणून दिसत आहे. त्याच वेळी दुसरीकडे राज कुद्रा याला अश्लील व्हिडिओ बनवल्याबद्दल आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली आहे. त्यानंतर १९ जुलै रोजी अटकेनंतर त्याला २० सप्टेंबरला म्हणजे जवळपास दोन महिन्यांनी जामीन मिळाला.