मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे बंडखोरीच्या पवित्र्यात असून समर्थक आमदारांसह ते सध्या सूरतमध्ये आहेत. याची गंभीर दखल शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. उद्धव यांनी बोलविलेल्या पक्ष आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच आला. त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तर, गटनेते पदी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या बैठकीनंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली आहे. चौधरी यांची पक्षाच्या गटनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र झिरवाळ यांना सादर करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे यांना गटनेते पदावरुन हटविण्यात यावे, अशी विनंती त्यांनी झिरवाळ यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता झिरवाळ हे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
https://twitter.com/ANI/status/1539222857011458049?s=20&t=4bd87l5gB1ccSRTz1ZHT9w
shhivsena delegation meet deputy assembly speaker narhari zirwal today