अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील शेवगाव तहसील कार्यालयातील लाचखोर महसूल सहाय्यक ४ हजार रुपयांची लाच घेताना सापडला आहे. संतोष महादेव गर्जे (वय ३८) असे लाचखोराचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिलेल्या माहितीनुसार, लाचेचे कारण – एका व्यक्तीची दोन मुले आणि भाचा हे जेलमध्ये आहेत. त्यांना जेलमधून सोडण्यासाठी मदत करणे तसेच तहसील कार्यालयात त्यांचेविरूद्ध येणाऱ्या चाप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी लाचखोर गर्जे याने लाच मागितली. प्रत्येक व्यक्तीसाठी २ हजार याप्रमाणे तीन जणांचे ६ हजार रुपयाची लाच त्याने मागितली. अखेर तडजोडी अंती ही रक्कम ४ हजार करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीने सापळा रचला. तहसील कार्यालयातच लाचखोर गर्जे याने लाच स्विकारली. आणि त्याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सापळा अधिकारी
मिरा आदमाने, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.न. 9921252549
सापळा पथक-
पो. ना. प्रकाश महाजन, पो. ना. प्रवीण महाजन, चालक हवा संतोष गांगुर्डे
*मार्गदर्शक –
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक-
02532578230,
वर्ग 2,
टोल फ्री क्रमांक १०६४ .