गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेतरस्ता व वहिवाटीच्या दाव्याबाबत महसूल आयुक्त गमे यांनी दिले हे आदेश

नाशिक विभागात आता स्थळदर्शक छायाचित्रे व जिओ टॅगिंगचा वापर बंधनकारक

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 29, 2021 | 5:17 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211029 WA0013

नाशिक – विभागातील शेतकऱ्यांच्या शेतरस्ता व वाहिवाटीच्या रस्त्यांच्या दाव्यामध्ये आता यापुढे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करताना स्थळ दर्शक छायाचित्रे आणि जिओ टॅगिंग बंधनकारक करण्यात येत असल्याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आवश्यक शेत रस्ते व वहिवाट रस्त्यांसंबंधी अनेक दावे तहसील कार्यालयात दाखल होतात. यामध्ये निर्णय घेताना प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून तहसीलदार आणि इतर महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी करणे बंधनकारक आहे. यापुढे शेत रस्त्यांच्या वाद प्रकरणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करतेवेळी उपस्थित तहसीलदार व इतर महसूल अधिकारी यांचे वादी व प्रतिवादी जर ते उपस्थित असतील, तर त्यांच्या समवेत छायाचित्रे, प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती, दिशा, चतु:सीमा तसेच सदर जागेचे स्थळ निरीक्षण करतेवेळी तारीख व वेळ दर्शविणारा रियल टाईम फोटो आणि अक्षांश व रेखांश फोटोमध्ये दर्शविणे यासह जिओ टॅगिंगचा वापर आता बंधनकारक करण्यात येत आहेत. असे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागातील सर्व अधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहेत.

शेतकऱ्यांचे शेतजमीन व वहिवाट विषयक रस्त्यांचे दावे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तेवर निकाली काढण्यास यामुळे मदत होणार आहे. रस्त्यांच्या वाद – विवाद प्रकरणी अशा प्रकारे प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून काढलेले फोटो हे रस्त्यांच्या दाव्यासंबंधी प्रकरणाचा कायदेशीर भाग असेल आणि प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी व वाद – विवाद प्रकरणी न्याय निर्णय पारित करताना याचा साकल्याने विचार करणे आवश्यक राहील.

शेतक-यांच्या शेत रस्ता तसेच वहिवाट रस्त्यांची अनेक प्रकरणे नियमित तहसील कार्यालयात दाखल होतात. त्यामुळे अनेक वेळा वाद-विवाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. रस्त्यांच्या प्रकरणी कार्यवाही करताना पक्षकार,पंच यांची संपूर्ण नावे, पत्ते,स्वाक्षरी, रस्त्याबाबतचा अडथळा यासह स्थळ निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे संपूर्ण नाव व पदनाम आणि स्वाक्षरी असणे आवश्यक राहील. जिओ टॅगिंग आणि सर्वंकष कायदेशीर प्रणालीचा वापर करुन शेतजमीन व वहिवाट रस्त्यांच्या प्रकरणी शेतकऱ्यांचे दावे प्रभावीपणे निकाली काढण्यास यामुळे मदत होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला आहे.

आयुक्त गमे म्हणाले की, शेतजमीन व शेत रस्ते प्रकरणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे रस्त्यांच्या संबंधी दाव्यांवर गुणवत्तापूर्ण कार्यवाही करण्यास आणि शेतक-यांचे रस्त्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रस्तावित मनमाड – कसारा लोहमार्ग आणि मेमूचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; खा. गोडसे

Next Post

वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
G1DIHtKXMAAFzBr
संमिश्र वार्ता

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…शिष्यवृत्तीसाठी आता एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार

सप्टेंबर 18, 2025
G1F4t faQAAKs27 e1758160633125
संमिश्र वार्ता

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

सप्टेंबर 18, 2025
Untitled 24
महत्त्वाच्या बातम्या

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा गजाआड…आरोपीचा धक्कादायक खुलासा

सप्टेंबर 18, 2025
Next Post
IMG 20211029 WA0214 e1635509637975

वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011