नाशिक – शेतकरी संघर्ष संघटनेची महत्वपूर्ण बैठक निफाड शासकीय विश्रामगृह येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी अनेक दिग्गजांनी शेतकरी संघर्ष संघटनेत प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजी. हंसराज वडघुले पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नाना बच्छाव,जिल्हा सरचिटणीस तानाजी वावधाने,जिल्हा संघटक रतन मटाले,युवा जिल्हाध्यक्ष नितिन कोरडे,जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे,जेष्ठ नेते साहेबराव मोरे,राज्य प्रवक्ते नितीन डांगे,भाऊसाहेब तासकर,दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष शरद आहेर,निफाड शहर अध्यक्ष सुनिल कापसे,शहर कार्याध्यक्ष अनिल वडघुले,दिंडोरी तालुकाध्यक्ष,विश्वनाथ जाधव,येवला तालुकाध्यक्ष सागर पगार,चांदवड तालुकाध्यक्ष छबुराव आवारे,जिल्हा संपर्कप्रमुख निवृत्ती न्याहारकर,दिव्यांग आघाडीचे निफाड तालुकाध्यक्ष कैलास कहांडळ,भूषण जाधव,सुभाष गायकवाड रसाळ पाटील,शांताराम जाधव,अमोल जाधव,बाळू जाधव,जगन्नाथ कडलक,माधवराव रोटे,विश्वनाथ जाधव,उत्तमराव रायते,दत्तू रायते,शिवराम रसाळ,दशरथ सुडके,सुभाष गायकवाड,सचिन राजोळे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत पारित झालेले ठराव-१) कर्नाटक राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच या घटनेचे समर्थन करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांच्या वक्तव्याचा निषेधाचा ठराव यावेळी करण्यात आला.२)केंद्र सरकारने शेतकरी हमीभावाचा कायदा पारित करून उत्पादन खर्चाच्या दीडपट मूल्य निर्धारित करावे.३) रानवड साखर कारखाना सुरू झाल्या बद्दल आमदार दिलीप बनकर,पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आघाडी सरकारचे अभिनंदन केले.तसेच शासन स्तरावरील अडचणी दूर होऊन निसाका सुरू केला जावा असा ठराव या वेळी करण्यात आला.३) वीज वितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली थांबवून शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी.४)वैद्यनाथ साखर कारखाना,छत्रपती
साखर कारखाना,द्वारकाधीश साखर कारखाना,संगमनेर साखर कारखाना यांच्याकडचे थकित पेमेंट शेतकरी,कामगार यांना तात्काळ अदा करावे. ५)केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे नाफेड कांदा खरेदी मध्ये अधिकारी व्यापारी संगणमत करून घोटाळा करत असल्याने याबाबत सीबीआय चौकशी करावी.६)द्राक्ष बागायतदार संघाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करून त्यांनी ठरवलेल्या द्राक्ष मूल्यांचे अंमलबजावणी व्हावी असा ठराव यावेळी करण्यात आला.७) बॅंकांची शेतकऱ्याला दिलेली कर्जे बेकायदेशीर दिले असतील तर ती अनैतिक ठरवली पाहिजे. ८)नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य घोषित केले असतांना वन्यप्राणी अभयारण्य लावलेले बेकायदेशीर बोर्ड तात्काळ काढावा असा ठराव करण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच जिल्हाभरातील शेतकरी संघर्ष संघटनेच्या तालुकाध्यक्षांनी आढावा सादर केला व आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कोणती उपक्रम व आंदोलन घेतली जातील याची मांडणी करण्यात आली. यावेळी विद्रोही साहित्य संमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल राजू देसले तर दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे इंजी.शंकर दरेकर यांचा विशेष सन्मान शाल,बुके देऊन करण्यात आला.यावेळी निफाड,येवला,नाशिक, चांदवड, नांदगाव,दिंडोरी, तालुक्यातील मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने शेतकरी व शेतकरी संघर्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे,स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब तासकर यांच्यासह शेतकरी संघर्ष संघटनेत अनेकांनी प्रवेश केला.यावेळी संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी संघटनेचा बिल्ला लावत व हातात झेंडा व नियुक्तीपत्र देत सन्मान केला.शेतकरी संघर्ष संघटनेत दिग्गजांनी प्रवेश केल्याने संघटनेची मोठी ताकद वाढली असून आगामी काळात राज्यभर संघटना बांधणी करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले. यावेळी बैठकीत सगळ्यांशी चर्चा करून शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदी सुधाकर मोगल, जेष्ठ शेतकरी नेते साहेबराव काका मोरे यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून तर निफाड तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब तासकर, चांदवड तालुका अध्यक्षपदी छकुला आवारे,निफाड तालुका दिव्यांग आघाडीचे अध्यक्षपदी कैलास कहांडळ,चांदवड दिव्यांग आघाडीचे अध्यक्षपदी रविंद्र जाधव निवड करण्यात आली. मा.इजि.हंसराज वडघुले यांच्यासह नाना बच्छाव यांनी सर्वांना नियुक्तीपत्र शाल,झेंडा देत सन्मान करण्यात आला.
शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी व्हावे
शेतकरी चळवळीत अग्रगण्य असणाऱ्या निफाड तालुक्यातून अनेकांनी शेतकरी संघर्ष संघटनेत प्रवेश केला असल्याने संघटनेला मोठे उज्वल भवितव्य आहे.शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाव तिथे शाखा उघडून राज्यभर संघटनेचे जाळे विस्तारित करावे, शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यासाठी कटिबद्ध राहावे. हमीभाव कायद्याच्या जागृतीसाठी तसेच शेतकरी समस्यांवर राज्यभर दौर्याची आखणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी व्हावे
इंजी.हंसराज वडघुले