नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हयात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवरात्रीच्या काळात शेतकरी पीक काढणीची वेळ असतांनाच परतीचा पाऊस बरसत असल्याने बळीराजा हवालदिल झालेला आहे. शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी परतीच्या पावासाला दैत्याची उपमा देत बळीराजा सप्तश्रृंगी देवीला साकडे घालतोय असे चित्र रेखाटले आहे. हे चित्र सुपावर रेखाटले आहे. त्यात शेतकरी जोगवा मागतो आहे असेही दाखवले आहे. त्याचप्रमाणे पावासने आता उसंत घ्यावी हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रातून केला गेला आहे.