बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी करा नवीन अर्ज…या अटी रद्द

by India Darpan
मे 29, 2025 | 7:07 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे’ या योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

सन 2024-25 या वर्षात शेतकऱ्यांची निवड करताना किमान बारावी उत्तीर्ण आणि वयोमर्यादा 25 ते 60 वर्षे अशी अट होती. मात्र, आयुक्त कृषी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत शिक्षण आणि वयोमर्यादा यासंबंधी अटी रद्द करण्यात आल्या आहेत. योजनेअंतर्गत महिलांचे शेतीतील योगदान लक्षात घेता, सन 2025-26 या वर्षासाठी महिला शेतकऱ्यांना अभ्यासदौऱ्याकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे.

2024-25 मध्ये युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि थायलंड या देशांची निवड अभ्यासदौऱ्यासाठी करण्यात आली होती. तर 2025-26 या आर्थिक वर्षात युरोप, इस्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन निकष व दौऱ्याचे देश बदलण्यात आले असल्यामुळे 2024-25 मध्ये करण्यात आलेली शेतकरी निवड रद्द करण्यात आली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांची यापूर्वी निवड झाली होती, त्यांनी नव्याने अर्ज केल्यास आणि पात्र ठरल्यास त्यांचाही विचार या योजनेंतर्गत केला जाणार आहे, असे तंत्र अधिकारी, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील विविध विषयांसंदर्भात मु्ंबईत मंत्रालयात बैठक…झाले हे निर्णय

Next Post

नाशिकमध्ये आजपासून राष्ट्रीय ब्रीज स्पर्धा…भारतीय संघाची होणार निवड

Next Post
Untitled 57

नाशिकमध्ये आजपासून राष्ट्रीय ब्रीज स्पर्धा…भारतीय संघाची होणार निवड

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011