शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत ऑडिओ बुक्समध्ये! या गीतकाराच्या आवाजात

मे 29, 2023 | 5:03 am
in मनोरंजन
0
0004302708

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युवा पिढीतील लोकप्रिय गीतकार-कवी संदीप खरे सर्वपरिचित आहेत. सोपी पण अर्थवाही, तसेच आजच्या पिढीच्या थेट परिचयाची भाषा आणि अभिव्यक्ती हे संदीप खरे यांच्या गीतांचे वैशिष्ट्य आहे. ‘चकवा’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘हाय काय नाय काय’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘‘मोरया’ असे २५ चित्रपट. संगीतकार सलील कुलकर्णी यांच्यासोबत ‘आयुष्यावर बोलू काही’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ असे लोकप्रिय सादर करणारे संदीप खरे आता स्टोरिटेलवर उन्हाळी सुट्टीनिमित्त अनोखा खजिना घेऊन येत आहेत. ‘शेरलॉक होम्स’च्या गाजलेल्या रहस्यकथा आता स्टोरीटेलवर त्यांच्या आवाजात ऐकता येणार आहेत. दीर्घकाळ जगभरातील वाचकांना भुरळ घालणाऱ्या या अजरामर कथा मराठीत ऑडिओबुकच्या स्वरूपात आणताना आलेल्या अनुभवांबद्दल संदीप खरे यांच्याशी साधलेला संवाद…

प्रश्न १) लहान मुलांसह सर्वक्षेत्रातील व्यक्तींसाठी तुम्ही खूप काम केलंय, लिहिलंय, कविता गाणी सगळं केलं आहे, या सगळ्यामध्ये शेरलॉक होम्सचं वाचन, हा प्रवास नेमका कसा सुरु झालं?
संदीप खरे : शेरलॉक होम्स हे इतकं अद्धभुत व्यक्तिमत्व आहे, त्याने माझ्या आयुष्यात खूप लहानपणीच प्रवेश केला आहे. भालबा केळकर यांनी अनुवादित केलीली शोरलॉक होम्सची सर्व पुस्तके मी लहानपणी वाचली आहे. आणि जेव्हा हा प्रोजेक्ट करायचा असं मला स्टोरिटेलने सांगितले तेव्हा खूप आनंद झाला. कारण मला आठवतंय कि या कथा मी वाचून दाखविल्या आहेत, पण त्या स्टुडिओमध्ये नाहीत तर स्टुडिओ बाहेर. बालपणाच्या काळात आपण जे जे वाचतो त्यामध्ये ‘फास्टर फेणे’ असो वा ‘टारझन’ असो. त्यावयात असताना माझ्यावर शेरलॉक होम्सने एक वेगळीच छाप उमटवली होती. आणि हे फक्त माझ्या बाबतीतच घडले असे नाही, तर जगभरातील सगळ्यांवर या कथांनी मोहिनी घातली होती. हे सगळं अद्धभुत म्हणावं तसं शेरलॉक होम्सने जगावर पकड घेतली, त्यांच्या कथांची भाषांतरे जगातल्या सगळ्या भाषांमध्ये झाली. आणि ती इतकी लोकप्रिय झाली आहेत कि मी या ‘ऑडिओबुक्स’मध्ये सुरुवातीला शेरलॉक होम्सबद्दल लिहिलं गेलं आहे ते सुद्धा वाचलं आहे. तेही ऐकण्यासारखं आहे. हे पात्र इतकं अजरामर झालंय कि ते खरोखरच होतं आणि अजूनही आहे असंच लोकांना वाटतंय. आजही लंडन येथील ‘२२१ बेकर्स स्ट्रीट’ला त्याचं क्रिएट घर, रुम आहे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे त्यांनी मला तेव्हापासूनच झपाटलं आहे.

प्रश्न २) ‘शेरलॉक होम्स’ या पात्राकडे तुम्ही कसं पहाता?
संदीप खरे : मी शेरलॉक होम्स लहानपणी वाचत असताना मला या व्यक्तिरेखेने पार झपाटलं होत आणि नेमके त्याचवेळी टीव्हीवर ‘ग्रॅनडा’ ही मालिका (Granada TV Series) सुरु झाली होती. यात जेरेमी ब्रेट (Jeremy Brett) ह्या अभिनेत्यानी ‘शेरलॅाक होम्स’ची भूमिका साकारली होती. अजूनही शेरलॉक होम्स म्हटलं कि तोच माझ्या डोळ्यासमोर येतो. ज्यांनी ही सिरीज पाहिली असेल त्यांना ‘स्टोरीटेलवर’ ही ‘ऑडिओ बुक्स’ची सिरीज ऐकताना हे नक्की जाणवेल कि मी जे मराठीत वाचलंय त्याचा प्रभाव मात्र या मालिकेतील व्यक्तिरेखेचा आहे. जेरेमी ब्रेट यांनी साकारलेल्या शेरलॉक होम्सच्या बोलण्याची ढब, त्याची एक्सेंट्रिक म्हणजे अतिशय हुशार असलेली माणसे जशी तंद्री लागल्या सारखी किंवा सणकू पद्धतीची असतात तशी ती शेरलॉक होम्सची प्रतिमा माझ्या मनात कोरली गेली आहे. मालिकेत दाखविलेली लंडन मधील लोकेशन्स, बग्गी, दगडी पेव्ह रोड, कॉस्च्युम्स, असं सारं वातावरण मला फार लोभस वाटतं. आणि या सोबत त्यातील रहस्य आणि त्यांची शेरलॉक होम्सने चतुराईने केलेली उकल यामुळे या व्यक्तिरेखेच्या आपसूक प्रेमात पडायला होते.

प्रश्न ३) मूळ शेरलॉक होम्स मधील गंमत अनुवादित कथांमध्ये कशी आली आहे?
संदीप खरे : कुमार वयोगटातच साधारणतः आपण वाचायला लागतो. या लहान वयात अद्भुत कथा सगळ्यांनाच वाचायला आवडतात आणि त्या आवडीने वाचल्याही जातात. ‘शेरलॉक होम्स’च्या मूळ कथांचे प्राध्यापक भालबा केळकर यांनी केलेले अनुवाद तसं पाहिलं तर अतिशय सोप्या सहज भाषेमध्ये आहे. त्यामुळे ओरिजनल कथांप्रमाणेच मराठीतील अनुवाद – भाषांतरही खूप इंटरेस्टिंग झालाय आणि तुम्ही एकदा हे स्टोरीटेलवर ऐकायला – वाचायला लागला की कधी पकड घेतली जाते, तुम्ही त्या कथेत केव्हा रमता हे कळत नाही. आम्ही लहान असताना ‘शेरलॉक होम्स’चे ‘पकडा पकडी’चे हे शहरी खेळ, सुट्टीच्या काळात गावातही खेळले जायचे. तू कुठून आलायस? तुझ्या बुटाच्या वरती असलेले मातीचे डाग, म्हणजे तू बागेतून आला आहेस, असे खेळात तर्क लावून ‘शेरलॉक होम्स’चे खेळ आम्ही मुले खेळत होतो. आणि हीच गंमत या अनुवादित कथांमध्ये असल्याने तीच धम्माल या कथा ऐकताना येते.

प्रश्न ४) बालपणी तुमच्यावर शेरलॉक होम्सच्या कथांनी नेमकी कोणती छाप उमटवली होती?
संदीप खरे : मराठी मीडियम मध्ये शिकलो आहे. त्यामुळे तसे इंग्लिश ते सुद्धा त्यांच्या एक्ससेन्ट(accent) कळणे शक्यच नव्हतं. आणि तरीही मी शेरलॉक होम्स यांच्यावरील इंग्रजी मालिकेचे पाऊण तास – एक तासाचे एपिसोड पूर्ण खिळून पहात बसलेला असे. बरं ते वय असं नव्हतं की ज्या प्रकारची रहस्य या कथेत सांगितलेत आणि ज्या प्रकारे त्याची उकल शेरलॉक होम्स करतो ते कळावं इतकं माझं वय नव्हतं. परंतु त्या मालिकेत दाखवलंय तसं त्यावेळेसचे ते लंडन, त्या सगळ्या त्याच्या बग्या, ते सगळे त्यांचे दगडी रोड, कॉस्च्युम, धुकं मला टेरिफिक आवडायचं, अजूनही आवडते. यातील शेरलॉक होम्सची चतुराई, त्याची रुबाबदार छबी, तीक्ष्ण नजर, अफाट बुद्धिमत्ता यामुळे त्याची माझ्यावर बालपणात पडलेली छाप, यामुळे नकळत सुट्टीच्या काळात त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जायचा.

प्रश्न ५) शेरलॉक होम्सचं वैशिष्ट्य काय सांगाल?
संदीप खरे : शेरलॉक होम्स आजही सर्वांना आवडतो, आवडत राहतो आणि त्याचे कारण म्हणजे तो माणूस झाला, मित्र झाला जसं हॅरी पॉटर आजच्या मुलांचा मित्र झाला तसेच शेरलॉक होम्सबद्दल म्हणता येईल. शेरलॉक होम्स (Sherlock Holmes) हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे व्यवसायाने खाजगी गुप्तहेर आहेत. अविश्वसनीय चातुर्य असलेले होम्स आधुनिक विज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हे सोडवत असे. शेरलॅाक होम्सच्या या कथा जगप्रसिद्ध असून तो आणि त्याचा सहकारी डाॅ. वाॅटसन हे जगभरातील गुप्तहेरकथा वाचकांच्या आणि कुमार वाचकांच्या गळ्यातील अजरामर काळासाठीचे ताईत बनले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

प्रश्न ६) स्टोरीटेलवरील शेरलॉक होम्सच्या या ऑडिओ बुक्सचे सादरीकरण करताना काळानुरूप तुम्ही कोणते वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला आहे का?
संदीप खरे : अनेकजण असं करतात की सुरुवातीला कथा वाचून घेतात आणि मग सुरुवात करतात. मला अपवाद करावासा वाटला अशासाठी की ते ‘रहस्य, रहस्य, रहस्य आहे ना ते मलाही खेचत जातं. मला जर का ते ऑलरेडी माहित असेल तर कदाचित शिळेपणा येऊ शकेल. म्हणून मी मुद्दामून खूप खोलात जाऊन त्याचा अभ्यास वगैरे केला नाही. कथा जरी त्याकाळची असली तरी ती क्लिष्ट भाषा नक्कीच. त्यामुळे मला नाव वाचताना फार गंमत येत गेली. एखादा रहस्यमय सिनेमा बघावा, तशी कथा सादर केली आहे. यात संवाद भरपूर आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेचा आवाज त्याच्या स्वभावानुसार दिला असून त्यातून मुळात कथा सांगितली आहे.

‘स्टोरिटेल’वरील संदीप खरे यांच्या आवाजातील ‘ऑडिओ बुक्स’ ऐकण्यासाठी लिंक
https://www.storytel.com/in/en/narrators/98934-Sandeep-Khare

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

सर्वाधिक विक्री होणारा हा आयफोन आता आऊटडेटेड!

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

सर्वाधिक विक्री होणारा हा आयफोन आता आऊटडेटेड!

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011