गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेंद्रा औद्योगिक वसाहतीत लघुउद्योगांसाठी पायलट प्रोजेक्ट; अशी राहणार त्याची वैशिष्ट्ये

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 22, 2022 | 5:21 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
x570 1

 

औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठवाड्यात लघु उद्योगवाढीसाठी अमृत या उपक्रमांतर्गत उद्योजकांसाठी 2 हजार चौ.फूट भूखंड व यात 1 हजार चौ.फुटावर बांधकाम उद्योग विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामुळे लघुउद्योजकांना पाठबळ व स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे यावेळी सांगितले. हा पथदर्शी (पायलट) प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यभर उद्योग विभागामार्फत असे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

चिकलठाणा औद्योगिक परिसरातील मराठवाडा लघुउद्योग (मसिआ) सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोहोयो तथा पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रदीप जैस्वाल, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उद्योजक मानसिंग पवार, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, यांच्यासह उद्योग विभागाचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

औरंगाबादच्या औद्योगिक विकासासाठी समृद्धी महामार्गास शेंद्रा एमआयडीसी जोडण्यासाठी 900 मीटरचा जोड रस्ता निर्माणासाठी निधी, तसेच औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते विकासाला निधी उपलब्ध करून दिला जाईल व तो निधी त्याच औद्योगिक क्षेत्रासाठी वापरण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित केला जाईल. अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, औरंगाबाद शहराच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून आवश्यक त्या बाबीसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन जाईल. त्याचप्रमाणे उद्योजकांच्या अडीअडीचणी समजून घेऊन लवकरात लवकर त्यावर उपाय योजना करण्याची ग्वाही यावेळी उपस्थित उद्योजकांना दिली.

सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, मसिआ ने मराठवाड्यात लघुउद्योजकांना वेळोवेळी सहकार्य, मदत आणि पाठबळ दिले आहे. यामुळे पाच ते साडे पाच हजार लघु उद्योजकांनी 3 लाख कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहत महानगरपालिका हद्दीत येत असल्याने रस्ता, पाणी आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात असल्याचे सांगितले. तसेच शेंद्रा परिसरात “कन्हेवेशन सेंटर ” तयार करण्याची मागणी उद्योग मंत्री यांच्याकडे केली. उद्योगासाठी सबसिडी, औरंगाबाद विमानतळा वरून अधिकच्या विमान फेऱ्या वाढवण्याबाबतची मागणी उद्योग मंत्री यांच्याकडे केली.

मसिआचे अध्यक्ष किरण जगताप म्हणाले की मानसिंग पवार यांच्या सहकार्यातून तयार करण्यात आलेले सभागृह मराठवाड्यातील उद्योजकांसाठी व्यासपीठ, प्रशिक्षण व सहकार्याचे ठिकाण बनेल. अशी माहिती प्रस्ताविकात देऊन मसिआच्या विविध उपक्रमाविषयी दिली.

Shendra Industrial Estate Pilot Project
Small Scale Industry

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणार ही विकास कामे पर्यटकांना मिळणार या सुविधा

Next Post

दिवाळीच्या पावनपर्वानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिल्या अशा शुभेच्छा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
Next Post
devendra fadnavis

दिवाळीच्या पावनपर्वानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिल्या अशा शुभेच्छा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011