गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेमा इलेक्ट्रिकच्या ३ हायस्पीड इ बाईकचे अनावरण; ४ तासात चार्ज होणार, १२०च्या स्पीडने धावणार

by Gautam Sancheti
सप्टेंबर 11, 2022 | 4:26 pm
in राज्य
0
Shema Electric Unveiling e1662893589552

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओडिशातील मेक-इन-इंडिया ईव्ही उत्पादक शेमा इलेक्ट्रिकने ईव्ही इंडिया एक्स्पो २०२२मध्ये तीन नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या आकर्षक श्रेणीचे अनावरण केले. इंडिया एक्स्पो सेंटरमध्ये आयोजित केलेल्या ईव्ही एक्स्पोने, या ब्रँडच्या ईगल प्लस, ग्रायफोन आणि टफ प्लस या नवीन ऑफर दाखवण्यासाठी ब्रँडसाठी व्यासपीठ परिपूर्ण म्हणून काम केले.

ईगल प्लस (हाय स्पीड):
या ब्रँडने, आपल्या श्रेणीचा विस्तार करत, हाय स्पीड श्रेणीतील नवीन ई-स्कूटर, ईगल प्लसचे अनावरण केले. ही ई-स्कूटर, ५० कि.मी. प्रतितास इतका वेग सहजतेने प्राप्त करू शकते आणि त्यामुळे स्थानिक प्रवासासाठी ती एक सोयीस्कर राइड बनते. ती एका पूर्ण चार्जवर १२० कि.मी.ची श्रेणी प्रदान करते. ही ई-स्कूटर, ३.५ ते ४ तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकणाऱ्या १२०० वॅटच्या बीएलडीसी मोटर आणि 3.2 किलो वॅट आवर लिथियम-आयन बॅटरीद्वारे चालित आहे.

ग्रायफोन:
हाय स्पीड श्रेणीतील या ब्रँडची आणखी एक ई-स्कूटर, कमाल ६० कि.मी. प्रतितास वेग देते आणि एका चार्जवर १३० कि.मी. अंतर कापते. या वाहनातील १५०० वॅटची बीएलडीसी मोटर आणि ४.१ किलो वॅट आवरची लिथियम-आयन बॅटरी ३.५ ते ४ तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.

टफ प्लस:
एक्स्पोमध्ये अनावरण केलेली तिसरी ई-स्कूटर- टफ प्लस ही, ब्रँडद्वारे विशेषत: लास्ट माईल डिलिव्हरीसाठी हाय स्पीड रेंजमध्ये आणखी एक भर आहे. ही ई-स्कूटर ६० कि.मी. प्रतितास वेगापर्यंत पोहोचते आणि एका पूर्ण चार्जवर १३० कि.मी. धावू शकते. या वाहनातील १५०० वॅटची बीएलडीसी मोटर आणि ४ किलो वॅट आवर एलएफपी बॅटरी ३.५ ते ४ तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.

सध्या, ब्रँडद्वारे आधीपासूनच चार कमी गतीची उत्पादने रस्त्यावर उतरवली आहेत. नवीन अनावरण केलेले ई-स्कूटर्स, अधिकृतपणे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे. शेमा इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीओओ, श्री योगेश कुमार लथ म्हणाले, “जेव्हा संपूर्ण ऑटोमोबाईल उद्योग, चालू असलेल्या ई-मोबिलिटी मिशनमध्ये योगदान देण्यासाठी अथक परिश्रम करत आहे, तेव्हा या क्रांतीने भारतीय उत्पादकांना त्यांचे नावीन्यपूर्ण कार्य मांडण्यासाठी वाव दिला आहे. शेमा इलेक्ट्रिकमध्ये आम्ही गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या पातळीवर तडजोड न करणारी उत्पादने देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला जाणीव आहे की, ग्राहक अनुभव ही केवळ आमच्यासाठीच नाही तर देशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जेणेकरून आम्ही सर्व मिळून, आयसीई वरून ईव्हीकडे जबाबदारीने जाणार आहोत. ईव्ही एक्सपो इंडिया येथे, आम्हाला मागणी समजून घेण्यासाठी आणि आमचे प्रयत्न प्रदर्शित करण्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ मिळाले आहे. आम्हाला आमच्या उत्पादन श्रेणीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की, आम्ही नवीन उत्पादने लाँच केल्यानंतर आम्ही त्याचा फायदा घेऊ.”

Shema Electric 3 E Bike Launch Features

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आशिया चषकाची आज फायनलः पाकिस्तान संघातील मतभेद मात्र चव्हाट्यावर

Next Post

सणासुदीत सर्वसामान्यांना आणखी एक दणका; दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर कडाडणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G1F4t faQAAKs27 e1758160633125
संमिश्र वार्ता

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

सप्टेंबर 18, 2025
Untitled 24
महत्त्वाच्या बातम्या

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा गजाआड…आरोपीचा धक्कादायक खुलासा

सप्टेंबर 18, 2025
G1EjK5lXIAA7N0k e1758158586845
महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विरुध्द पाकिस्तानचा पुन्हा सामना….यूएई विरुध्द सामना जिंकल्यामुळे सुपर फोरमध्ये लढत

सप्टेंबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यावसायिक प्रगती साधता येईल, जाणून घ्या, गुरुवार, १८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

सणासुदीत सर्वसामान्यांना आणखी एक दणका; दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर कडाडणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011