इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काटा लगा फेम अभिनेत्री -मॉडेल शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्या मुंबईतील अंधेरी भागात राहत होत्या. तिच्या कुटुंबातील सदस्य काल रात्री उशिरा तिला घेऊन रुग्णालयात पोहोचले होते आणि तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुंबई पोलिसांना काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. कूपर रुग्णालयात पोस्टमार्टम केले जात आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.”
मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, तिचा मृतदेह अंधेरी परिसरातील तिच्या राहत्या घरी आढळला. मुंबई पोलिसांना याची माहिती पहाटे १ वाजता मिळाली. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शेफाली वयाच्या १५ व्या वर्षापासून आकडीच्या त्रासाने पीडित होती. सध्या कार्डियक अरेस्ट तिच्या मृत्यूच कारण सांगितले जाात आहे. शेफालीला नवरा पराग त्यागी आणि अन्य लोक बेलव्यू मल्टीस्पेशलिटी रुग्णालयात घेऊन आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात देण्यात आला.