सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड परिसरात आज पहाटे पासून धुक्याची चादर पसरल्याचे चित्र सर्वत्र होते. धुक्यामुळे दृष्य मानता कमी झाल्याने वाहनांना लाईट लावण्याची वेळ आली होती. दोन फुटावरील व्यक्तीही दिसत नव्हते. सतत पडणारा पाऊस आणि पहाटे पडणारे दव यामुळे कांदा रोपावर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी पडलेल्या या धुक्याचा मॉर्निग वॉकला गेलेल्यानी आनंद लुटला.