शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आदित्य-एल 1 ने सूर्याच्या प्रभावळीतील शक्तिशाली सौर ज्वाळांचे दृश्य टिपले

by Gautam Sancheti
मार्च 1, 2025 | 11:47 am
in संमिश्र वार्ता
0
solar 1DJWC

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारताची पहिली समर्पित सौर अंतराळ मोहीम असलेल्या आदित्य-एल 1 वरील ‘एसयूटी (SUIT)’, या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने (दुर्बीण) सूर्याच्या प्रभावळीतील फोटोस्फीअर आणि क्रोमोस्फीअर या वातावरणात ‘कर्नेल’, म्हणजेच शक्तिशाली सौर ज्वाळांचे अभूतपूर्व दृश्य टिपले आहे. सौर भौतिकशास्त्रातील ही ऐतिहासिक झेप आहे.

एसयूटीने 22 फेब्रुवारी 2024 रोजी एक्स 6.3-क्लास ची सौर ज्वाला टिपली होती, ज्याची अल्ट्राव्हायोलेट (एनयूव्ही) तरंगलांबी श्रेणी (200-400 एनएम) इतकी होती. सूर्याचा संपूर्ण पृष्ठभाग संपूर्ण तरंगलांबीच्या श्रेणीत एवढ्या बारीक तपशिलांसह प्रथमच चित्रित करण्यात आला आहे. ही निरीक्षणे सूर्याच्या पृष्ठभागावरील स्फोटक घडामोडी आणि सूर्याच्या वातावरणातील विविध थरांमध्ये ऊर्जा हस्तांतरण नियंत्रित करणाऱ्या जटील प्रक्रियांबद्दलचा नवा दृष्टीकोन देतात.

चुंबकीय ऊर्जा अचानक मुक्त झाल्यामुळे निर्माण होणार्‍या सौर ज्वालांचा अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो, उपग्रह परिचालन, रेडिओ दळणवळण आणि पॉवर ग्रिडवर परिणाम होऊ शकतो, तसेच अंतराळवीर आणि विमान प्रवाशांसाठी ते धोकादायक ठरू शकते. इतिहासात एक शतकाहून अधिक काळ अशा घटनांची नोंद झाली आहे, परंतु समर्पित अंतराळ दुर्बिणींच्या कमतरतेमुळे एनयूव्ही बँडमधील डेटाची नोंद झाली नाही. एसयूआयटी उपकरण आता सूर्याच्या पृष्ठभागावरील घडामोडींबद्दल आपली समज वाढविणारी अशा प्रकारची पहिली निरीक्षणे देऊन ही मोठी पोकळी भरून काढत आहे.

एसयूटीच्या निरीक्षणांमधून झालेला मोठा खुलासा म्हणजे, सूर्याच्या पृष्ठभागावरील एकाच भागातील स्फोट. सूर्याच्या प्रभावळीतील प्लाझ्माच्या तापमान वाढीशी त्याचा थेट संबंध आहे. हे निष्कर्ष फ्लेअर एनर्जी डिपॉझिशन आणि हीटिंग मधील थेट दुवा सांगतात, जे सौर भौतिक शास्त्रीय संशोधनाचे नवे मार्ग खुले करतात आणि दीर्घ काळापासून केल्या जाणाऱ्या सैद्धांतिक भाकितांची पडताळणी करतात.

आयुकाचे संचालक प्रा. श्रीआनंद, यांनी एसयूटीच्या योगदानाची ‘अभूतपूर्व’ अशा शब्दांत प्रशंसा केली असून, आदित्य-एल 1 च्या महत्वाच्या निष्कर्षांची ही सुरुवात असल्याचे म्हटले आहे. एसयूआयटी आणि इतर उपकरणे पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे, आदित्य-एल 1 सौर संशोधनात क्रांती घडवून आणेल, तसेच जागतिक अंतराळ विज्ञानात भारताला अव्वल स्थान मिळवून देईल.

पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) येथील प्रा. दुर्गेश त्रिपाठी आणि प्रा. ए.एन.रामप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.ची विद्यार्थिनी सौम्या रॉय यांनी हे संशोधन केले असून, भारत आणि जर्मनीतील अग्रगण्य संस्थांचे यामध्ये योगदान आहे. हे निष्कर्ष द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स (डीओआय: 10.3847/2041-8213/एडीबी0बीई) मध्ये प्रकाशित झाले आहेत. हे यश प्रगत सौर निरीक्षणाच्या परिवर्तनशील क्षमतेवर प्रकाश टाकते, असे सौम्या रॉय म्हणाल्या. ही निरीक्षणे सूर्याची स्फोटक शक्ती बारीक तपशिलांसह उघड करतात, असे प्रा. दुर्गेश त्रिपाठी म्हणाले. हे प्रारंभिक निकाल नवीन उपकरणांची अफाट क्षमता दर्शवितात, जी यापुढेही असे अनेक शोध लावतील, असे प्रा. ए. एन. रामप्रकाश यांनी नमूद केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बेरोजगारांना ७१ लाखाचा चुना लावणारा तोतया पीए गजाआड…अशी केली फसवणूक

Next Post

गोवर्धन गोळीबार प्रकरणी ४ जण गजाआड…तंटामुक्ती समिती अध्यक्षावर गोळी झाडण्याचा प्रयत्न

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime1

गोवर्धन गोळीबार प्रकरणी ४ जण गजाआड…तंटामुक्ती समिती अध्यक्षावर गोळी झाडण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

ग्राम विकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री संयुक्त बैठक 2 1024x682 1 e1754659804441

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे मंत्र्यांचे निर्देश…

ऑगस्ट 8, 2025
daru 1

दारू दुकान फोडून चोरट्यांनी ४ लाखांच्या महागड्या दारुच्या बाटल्या केल्या लंपास…गंगापूररोडवरील घटना

ऑगस्ट 8, 2025
shivsena udhav

नाशिकमध्ये मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, दोन नेत्यांमध्ये शाब्दिक वाद

ऑगस्ट 8, 2025
crime1

सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0304

राज्य शासनाने शहरासाठी ७ पोलीस स्टेशन मंजूर करण्याची ही राज्यात पहिलीच वेळ…मुख्यमंत्री

ऑगस्ट 8, 2025
fir111

ट्रान्स्पोर्ट कार्यालयात शिरून व्यावसायीकाकडे खंडणीची मागणी…तीन जणांवर गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011