इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यपदी शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाची चर्चा होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ये मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म १९ ऑक्टोंबर १९६३ रोजी झाला.
ते १९९९ साली प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर ते कोरेगाव मतदार संघातून आमदार झाले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.