विशेष प्रतिनिधी, मुंबई :
बॉलीवूड चित्रपट क्षेत्रात सुपरस्टार सुपरस्टार ही संकल्पना गेल्या पन्नास वर्षापूर्वी अस्तित्वात आली, असे म्हटले जाते खरे म्हणजे राजकपूर, देव आनंद, दिलीप कुमार हे देखील सुपरस्टारच होते. परंतु त्यानंतर राजेश खन्ना यांना खऱ्या अर्थाने सुपरस्टार ही उपाधी तथा पदवी प्राप्त झाली. दरम्यानच्या काळात त्याही आधी किंवा नंतर अनेक अभिनेते सुपरस्टारच्या रांगेत होते परंतु बिग बी अमिताभ बच्चन यांनी बाजी मारली. कालौघात बॉलीवूड मध्ये प्रचंड उलथापालथ झाली, इतकेच नव्हे मोठी स्पर्धा निर्माण झाली.
कालांतराने अनेकांना मागे टाकत शाहरुख खान याने सुपरस्टार ही उपाधी आपल्याकडे खेचून घेतली. आजही शाहरुख खानच्या नावावर भोवती वलय असते, ‘किंग खान ‘ या नावाने तो रसिकमनावर अधिराज्य गाजवत आहे. अशा या सुपरस्टार कडे किती संपत्ती आहे ? याची अनेकांना उत्सुकता असते. त्याची संपत्ती पाहून सर्वांच जण आश्चर्याने थक्क होतात. आता जाणून घेऊ त्याच्या एकूणच जीवन कार्याविषयी आणि संपत्ती विषयी… सध्या शाहरुख खानचे वय ५५ असून गेल्या २५ वर्षांपासून बॉलिवूडवर तो राज्य करत असून त्याला फिल्म इंडस्ट्रीचा किंग खान म्हटले जाते. त्याने १०० हून अधिक चित्रपट भूमिका केल्या असून शाहरुखला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. इतकेच नव्हे आतापर्यंत १४ फिल्मफेअर पुरस्कार त्याच्या बॅगमध्ये गेले आहेत. तसेच फ्रान्स सरकारने शाहरुख खानला कला पुरस्कारही दिला आहे.
शाहरुखची फॅन संख्या प्रचंड असून तो करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. एकेकाळी ५० रुपये पगारावर काम करणारा शाहरुख खान सध्या कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक आहे. तो केवळ चित्रपटांमधूनच नव्हे तर जाहिरातींमधूनही लाखो रुपये कमवतो. शाहरुखची प्रत्येक चित्रपटाची कमाई सुमारे २५ कोटी रुपये आहे. एकेकाळी आईकडून हजार रुपये घेऊन मुंबई शहरात पोहोचलेला शाहरुख खानचा आज मुंबईतच राहत आहे. सध्या तो आलिशान जीवन जगत असून त्याच्याकडे कार आणि बाईकचा चांगला संग्रह आहे. चित्रपट करण्यापूर्वी त्यांनी टीव्ही शोमध्येही काम केले. त्याच्या पहिल्या टीव्ही सीरियलचे नाव फौजी होते, त्यात शाहरुखने एका सैनिकाची भूमिका केली होती. तो दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमध्ये शिकला आहे.
मुंबईत शाहरुख खानचा ‘मन्नत ‘ हा बंगला जगातील टॉप १० बंगल्यांमध्ये समाविष्ट आहे. त्याला पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी बनलेले आहे. त्याचा मन्नत बंगला पाहण्यासाठी दररोज लाखो लोक येतात. सध्या त्याची किंमत २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे शाहरुख खान हा सुमारे ५ हजार कोटींच्या एकूण मालमत्तेचा मालक आहे. त्यांचे मासिक उत्पन्न २० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एकेकाळी नाटके पाहून यातूनच शाहरुखचा अभिनयाकडे जाण्याचा कल होऊन आवड निर्माण झाली.
शाहरुखच्या आई -वडिलांचे नाव लतीफ फातिमा खान आणि ताज मोहम्मद असे खान होते. शाहरुखचा जन्म दि. २ नोव्हेंबर १९६५ रोजी दिल्लीत झाला असून त्यांचे बालपण बंगळूरुमध्ये गेले. तेथे त्यांचे वडील मुख्य अभियंता होते. शाहरुख हा ५५५ क्रमांकाच्या प्रेमात असून त्याच्या सर्व वाहनांच्या नेमप्लेट मध्ये ५५५ येते. शाहरुख हा गौरीच्या प्रेमात पडला जेव्हा ते दोघेही पहिल्यांदा एका पार्टीमध्ये भेटले. शाहरुखने पहिल्या दृष्टीक्षेपात गौरीला आपले दिल दिले. त्यावेळी शाहरुखचे वय १९ वर्षे आणि गौरी १४ वर्षांचे होते.
शाहरुख खानचे दुबईमध्ये स्वतःचे घर असून त्याची किंमत २०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. दुबई व्यतिरिक्त, शाहरुखचे लंडनमध्ये स्वतःचे घर असून त्याने २००९ मध्ये खरेदी केले. त्याची किंमत २०० कोटींपेक्षा जास्त असल्याचेही सांगितले जाते. १९९२ मध्ये दीवाना या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारा शाहरुख सध्या जगातील अव्वल अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्याकडे संपत्तीचा ओघ सुरूच असून त्याबद्दल असेही म्हटले जाते की, शाहरुख खानची संपत्ती सन २०२५ पर्यंत १ अब्ज डॉलर इतकी असेल.