मुंबई – देशातील प्रमुख स्टॉक एक्स्चेंज असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ट्रेडिंग दरम्यान तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी ही तत्त्वे देण्यात आली आहेत. यानुसार सदस्यांनी ठरलेल्या मुदतीत दोषाबाबत एक्सचेंजला माहिती न दिल्यास यंत्रणा सुरळीत होईपर्यंत त्यांना दररोज २० हजार रुपये भरावे लागणार आहेत.
बीएसई आणि एनएसईने ट्रेडिंग संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की, तांत्रिक दोषांमध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सदस्यांद्वारे प्रदान केलेल्या इतर उत्पादने आणि सेवांमधील दोषांचा समावेश असेल. विशेषतः ज्या सदस्यांची विशिष्ट नोंदणीकृत सदस्य संख्या ५० हजारांहून अधिक असेल, त्यांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक ठरणार आहे.
विशेष म्हणजे कोणत्याही तांत्रिक बिघाडाची माहिती या सदस्यांना दोन तासांच्या आत एक्सचेंजला द्यावी लागेल. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सदस्यांना १२ महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यामुळे या नियमांचे योग्य पालन होईल आणि अंमलबजावणीत सुसूत्रता येईल, असे म्हटले जाते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील मोठ्या तथा बड्या गुंतवणूकदारांची भेट घेतली आणि पुढील अर्थसंकल्पासाठी सूचना मागवल्या. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुंतवणूक वाढवणे आणि व्यवसाय सुलभ करण्याबाबत चर्चा केली आहे. त्याचा उद्देश अधिक भांडवल आकर्षित करणे आणि अर्थसंकल्पात सुधारणा योजना सादर करणे हा आहे.
विशेषतः अर्थसंकल्पापूर्वी जागतिक गुंतवणूकदारांकडून बदलांसाठी सूचना घेणे हा पंतप्रधान यांचा हेतू आहे, त्यामुळे संबंधित गुंतवणूकदार हे अनुकूल धोरणांवर काम करू शकतील आणि देशाला गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक बनवू शकतील. इतकेच नव्हे तर नोव्हेंबरमध्येही पंतप्रधान मोदी यांनी २० मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांची भेट घेतली होती.