मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असाल किंवा तुम्ही जर ब्रोकर असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, सेबीने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे ट्रेडिंगचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शेअर मार्केट हे विश्वच वेगळं आहे. बरेच लोक यात गुंतलेले असतात, पण प्रत्येकालाच ते जमेल असे नाही. जागतिक बाजारपेठ, जागतिक राजकारण, शिक्षण, आरोग्य अश्या कुठल्याही क्षेत्रातील घडामोडींचा या शेअर मार्केटवर पटकन परिणाम होतो. एवढच कशाला भारताचे पंतप्रधान किंवा अमेरिका, इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष बदलले तरी शेअर मार्केटवर परिणाम होतो. या क्षेत्रातील गुंतवणूकदार व ब्रोकरसाठी एका विशिष्ट्य प्रसंगाला गरज पडल्यास ट्रेडिंगची वेळ वाढविण्याचा निर्णय सेबीने जाहीर केला आहे.
राजकारणात एखादी मोठी घटना घडू देत किंवा शेअर मार्केटमध्ये मोठे बदल होऊ देत… ‘आम्हाला काय पडलय’ असं म्हणण्याचे सर्वसामान्य माणसाचे दिवस कधीच संपले आहेत. कारण आता यापैकी कुठल्याही घडामोडीवर आपलं दैनंदिन जीवन अवलंबून राहावं, एवढी ही क्षेत्रं आता आपल्या जवळ येऊन पोहोचली आहेत. या क्षेत्राशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय सेबीने जाहीर केला आहे. स्टॉक एक्स्चेंजमध्ये कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास आता ट्रेडिंगचा वेळ वाढवून देण्यात येईल, असे सेबीने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात सेबीने एक परिपत्रक जारी केले आहे. अर्थात तांत्रिक अडचणीची माहिती मार्केटमध्ये अॅक्टीव्ह असलेल्यांनी १५ मिनिटांच्या आत सेबीला द्यायची आहे. ही माहिती मेसेजद्वारे द्या किंवा वेबसाईटवरून द्या, पण तातडीने कळविल्यास त्यावर कार्यवाही करणं सेबीला सोयीचं ठरणार आहे. ट्रेडिंग करणारे, भांडवली संस्था, बाजारपेठेत गुंतवणुक करणारे या साऱ्यांना परिपत्रकाच्या माध्यमातून सेबीने ही माहिती दिली आहे. त्याचवेळी स्टॉक मार्केटच्या एखाद्या सेगमेंटमध्ये अडचणी आल्या तरी इतर सेगमेंटमधील व्यवहार सुरू ठेवण्याच्या सूचनाही सेबीने दिल्या आहेत.
तर बदल होणार नाही
शेअर बाजार बंद होण्याच्या एक तासाच्या आत ट्रेडिंग सुरू झाले नाही तर ट्रेडिंगची वेळ ९० मिनिटांपर्यंत वाढविण्यात येईल. पण, ट्रेडिंग बंद होण्याच्या एक तासाच्या आत तांत्रिक अडचण दूर झाल्यास व्यवहाराच्या वेळा बदलणार नाहीत, असेही सेबीने स्पष्ट केले आहे.
ब्रोकरसाठी महत्त्वाचा निर्णय
मार्केट बंद झाल्यानंतर ४५ मिनिटांतही तांत्रिक अडचण दूर झाली नाही, तर ट्रेडिंगच्या वाढीव वेळेतही व्यवहार करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असाही निर्णय सेबीने घेतला आहे. गुंतवणुकदार व ब्रोकरच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
Share Market Stock Exchange SEBI Big Decision Trading Time
Mumbai BSE Brokers Investors