मुंबई – व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये अफरातफर तसेच बाजार नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सेबीने सात कंपन्यांना दंड ठोठावला आहे. सेबीने एप्रिल-सप्टेंबर २०१७ च्या दरम्यान या प्रकरणाची चौकशी केली होती.
या कारवाईमुळे शेअर बाजारातील आणखी एक घोटाळा समोर आला आहे. सेबीने आदेशात म्हटले की, एक्यूटी मर्चेंट कोस्टल फर्टिलायजर्स, रिचहोल्ड प्रॉपर्टी, काबेरी गुड्स, इन्वारेक्स विन्कॉम, आकाक्षां कमोडिटीज आणि गोदावरी कॉमर्शियलने व्हिडिओकॉन कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारात घोटाळा केला आहे. सर्व कंपन्यांवर एक-एक लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. व्हिडिओकॉनचे प्रवर्तक आणि एक्यूटी मर्चेंटदरम्यान बाजार नियमांविरुद्ध पैशांचा व्यवहार झाला आहे. त्यानंतर एक्यूटी मर्चेंटने या शेअर्सना इतर सहा कंपन्यांमध्ये ट्रान्सफर केला. हा संपूर्ण व्यवहार बाजारांच्या निकषांनुसार झालेला नाही, असा ठपका सेबीने ठेवला आहे.