मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय शेअर बाजाराबाबात मोठी अपडेट आली आहे. पुढील आठवड्यात २७ जानेवारीपासून टी+१ सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याअंतर्गत बाजारात ट्रेड पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदारांना सेटलमेंटची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी वाट पहावी लागणार नाही. अवघ्या २४ तासांत रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा होईल. परिमाणी व्यवहार अधिक सुलभ होण्यास मदत मिळेल.
टी+1 सुविधेमुळे गुंतवणूकदारांना निधी आणि शेअरमध्ये तेजीने ट्रेड सेटलमेंट करता येतील. त्यांच्या खात्यात आता पूर्वीपेक्षा एक दिवस आधी रक्कम जमा होईल. सेटलमेंटची सायकल आता लवकर पूर्ण होईल. त्यामुळे गुंतवणूकदाराची रक्कम अडकून राहणार नाही. शेअर बाजारात खरेदीदार आणि विक्री करणारे यांच्यात ट्रेड पूर्ण झाला की रक्कम ही लवकर मिळेल. जुन्या नियमामुळे सेटलमेंटसाठी दोन दिवसांची वाट पहावी लागत होती. पण आता एका दिवसातच ट्रेड सेटलमेंट होतील. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात रक्कम लवकर जमा होईल.
नियमाबाबत मत – मतांतरे
नव्या नियमामुळे बाजारात गुंतवणूकदारांची संख्या आणि गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. व्यवहारांनाही गती मिळेल. परदेशातील गुंतवणूकदारही जादा रक्कम गुंतवतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. दुसरीकडे काही तज्ज्ञांना हा नियम रुचला नाही. या नियमामुळे बाजारात आता मोठे चढउतार पहायला मिळतील, अशी आशंका त्यांनी व्यक्त केली आहे. काही कॉर्पोरेट्स, परदेशी गुंतवणूकदार, मोठे शेअरधारक याचा फायदा उचलत धडाधडा ट्रेड पूर्ण करुन बाजाराला हलते ठेवतील असा त्यांचा अंदाज आहे.
परतावा २४ तास आधी
सध्या शेअर बाजारात टी+२ पद्धत लागू आहे. यामुळे बँक खात्यात ट्रेड सेटलमेंटनंतरची रक्कम पोहचण्यास ४८ तासांचा कालावधी लागतो. शेअर बाजारात टी+२ नियम २००३ साली लागू करण्यात आला होता. आता २७ जानेवारीपासून टी+१ सुविधा दिली जाणार आहे. लार्ज कॅप आणि ब्लू –चिप कंपन्या ही सुविधा देतील. त्याअंतर्गत खरेदीदार आणि विक्री करणाऱ्यांना २४ तासांत रक्कम मिळण्याची परवानगी मिळणार आहे.
Share Market New Facility from 27 January
Trading Cycle T Plus 1 Settlement