मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – शेअर बाजारातील घसरणीच्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले आहेत, तर काही छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे दोन ते अडीच पटांवर गेले आहेत. फक्त एम्पायरियन काजू लि., कोहिनूर फूड्स आणि कृतिका वायर्स सारख्या समभागांनी प्रचंड परतावा दिला आहे.
एम्पायरियन काजू लि. ने 15 ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअरने 140.31 टक्के परतावा दिला आहे. शेअर 4.97 टक्क्यांनी वाढून 156.20 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका आठवड्यात शेअर 21.46 टक्क्यांनी वधारला आहे. त्याच वेळी, त्यात एका महिन्यात 164.75 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोहिनूर फूड्सची कामगिरी देखील चांगली राहीली आहे. या स्मॉल कॅप स्टॉकने 15 दिवसांत 111.83 टक्क्यांनी झेप घेतली आहे. सोमवारी तो 4.79 टक्क्यांनी वाढून 19.70 रुपयांवर बंद झाला. त्यात एका आठवड्यात 20.86 टक्के आणि एकाच महिन्यात 131.76 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर आपण 52 आठवड्यांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर त्याची कमी किंमत 7.75 रुपये आणि उच्च 19.70 रुपये आहे.
कृतिका वायर्सनेही आपल्या गुंतवणूकदारांना १५ दिवसांत श्रीमंत केले. या कालावधीत स्टॉक 110.35 टक्क्यांनी वाढला आहे. सोमवारी, तो 9.97 टक्क्यांनी झेप घेऊन 77.20 रुपयांवर बंद झाला, तोही बाजार खराब झाला असताना. कृतिका वायर्सच्या शेअर्सने एका आठवड्यात ४६.२१ रुपयांचा परतावा दिला आहे.
Impex Ferro Tech ने मागील 15 ट्रेडिंग सत्रांमध्ये 96.30 टक्के परतावा दिला आहे. सोमवारी तो 4.95 टक्क्यांनी वाढून 5.30 रुपयांवर बंद झाला. आणखी एक स्टॉक जेनिथ बिर्ला देखील सोमवारी 4.94 टक्क्यांनी वाढून 4.25 रुपयांवर बंद झाला आणि गेल्या 15 दिवसात 93.18 टक्क्यांनी वाढला आहे.