ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना काळात भारतीय शेअर बाजारात साखरनिर्मितीच्या क्षेत्रातील शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. साखर उद्योगाशी संबंधित बहुतांश स्टॉक नव्या उंचीवर पोहोचले आहेत. २०२१ मध्ये गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडणाऱ्या तीन स्टॉक्सबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या स्टॉकद्वारे २०२२ दरम्यान गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याची शक्यता आहे.
१) सर शादीलाल एंटरप्रायजेस लिमिटेड
साखर क्षेत्रातील हा असा स्टॉक आहे, जो शंभर टक्के परतावा (मल्टी बॅगर स्टॉक) देतो. या स्टॉकने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना ३९० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या स्मॉलकॅप स्टॉकचे मार्केट कॅप जवळपास ९८ कोटी रुपयांचे आहे. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २३२.७० रुपये आहे. तर ५२ आठवड्यांचा नीचांक ३२.७५ रुपये आहे. गेल्या शुक्रवारी बीएसई इंडेक्सवर स्टॉकच्या भावात ०.०३ टक्के वाढ होऊन तो १८६.१५ रुपयांच्या पातळीवर बंद झाला.
२) राणा शुगर
२०२१ या वर्षातील हा मल्टी बॅगर स्टॉक सिद्ध झाला आहे. तो एका वर्षात ६.६० रुपयांनी वाढून ३८.३० रुपयांपर्यंत आला आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवसायाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी या स्टॉकच्या भावात घसरण झाली. या दिवशी स्टॉकचा भाव २७.८५ रुपये राहिला. या स्टॉकने गेल्या एका वर्षात जवळपास ३३३ टक्क्यांचा परतावा आपल्या शेअरधारकांना दिला आहे. या शुगर स्टॉकचे मार्केट कॅप ४२७.६९ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी यामध्ये डिसेंबर २०२१ मध्ये आपली भागीदारी वाढवली आहे.
३) एसबॅक शुगर लिमिटेड
गेल्या एका वर्षात हा मल्टी बॅगर स्टॉक ५.३६ रुपयांवरून वाढून २८ रुपये प्रति शेअरवर आला आहे. या काळात या स्टॉकने जवळपास ३२०.९० टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात याने ०.५२ टक्क्यांचा किरकोळ परतावा दिला आहे. स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४२.०५ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांचा नीचांक ५.३६ रुपये राहिला आहे. यामध्ये प्रवर्तकांची भागीदारी ६५.१२ टक्के, तर परदेशी गुंतवणूकदारांची २.०१ टक्के भागीदारी आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी स्टॉकचा भाव २७.०५ रुपये होता.