मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारांमध्ये चढ-उतार होतच असतात सध्या तर जगात युध्दामुळे शेअर्समध्ये अत्यंत अस्थिर परिस्थिती असल्याचे सांगण्यात येते, परंतु पेंनी स्टॉक बाबत मात्र हा अपवाद म्हणता येईल, कारण पेंनी स्टॉक मध्ये प्रचंड फायदा शेअर्स धारकांना प्रचंड फायदा मिळत आहे. पेनी स्टॉकचा रिटर्न वितरीत करण्याचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड आहे. सध्या च्या काळात असे अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्यात फक्त लाखो रुपये गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना करोडोंचा फायदा झाला आहे. त्यात असाच एक पेनी स्टॉक इंडो काउंट इंडस्ट्रीजचा आहे. एकेकाळी हा स्टॉक 2 रुपयांपेक्षा कमी होता आणि आता तो 170 रुपयांच्या पुढे गेला आहे. इंडो काउंट इंडस्ट्रीजच्या समभागांनी 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 13,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
16 मार्च 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.26 रुपयांच्या पातळीवर होते. 25 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर रु. 174.50 वर बंद झाले. कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 13,800 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 16 मार्च 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर ती रक्कम सध्या 1.38 कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती.
8 मे 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर्स 24.40 रुपयांच्या पातळीवर होते. 25 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 174.50 रुपयांवर बंद झाले. तसेच कंपनीच्या समभागांनी 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास 715 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीने दि. 8 मे 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आजपर्यंत हे पैसे 7.15 लाख रुपयांच्या जवळपास गेले असते. इंडो काउंट इंडस्ट्रीजच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 314.80 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची निम्न पातळी 113 रुपये आहे.