मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – एका कंपनीच्या शेअर्सची कामगिरी इतकी चांगली आहे की, काही हजार रुपये गुंतवणारे गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. कमी किंमत असलेल्या अवंती फीड्स लिमिटेडच्या ‘लहान’ स्टॉकने चमकदार परतावा दिला आहे. अवंती फीड्सच्या शेअर्सने अवघ्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अवंती फीड्सचा स्टॉक एकदा 2 रुपयांपेक्षा कमी होता आणि त्याने गुंतवणूकदारांना 36 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. दि. 11 फेब्रुवारी 2010 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर अवंती फीड्सचे शेअर्स 1.65 रुपये होते. 11 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 596.55 रुपयांच्या पातळीवर आहेत. विशेष म्हणजे कंपनीच्या समभागांनी गेल्या 12 वर्षांत सुमारे 36,150 टक्के परतावा दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 11 फेब्रुवारी 2010 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 10 हजार रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आजच्या तारखेनुसार पैसे 36.15 लाख रुपये झाले असते.
एखाद्या व्यक्तीने जर 11 फेब्रुवारी 2010 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याची सध्याची किंमत 3.6 कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती. अवंती फीड्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 675 रुपये आहे. त्याच वेळी, समभागांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 411.85 रुपये आहे. दरम्यान, कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 8,100 कोटी रुपये आहे. अवंती फीड्सच्या शेअर्सचा सर्वकालीन परतावा 112,320 टक्के आहे. एकेकाळी कंपनीचे शेअर्स 53 पैशांवरही होते. मात्र आता बडा धमाका झाल्याने गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे