गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या स्टॉकचे छप्पर फाडके रिटर्न्स; गेल्या १० वर्षात तब्बल ६ वेळा दिला बोनस शेअर

by India Darpan
सप्टेंबर 7, 2022 | 5:15 am
in राष्ट्रीय
0
investment

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजारात एखादा मल्टीबॅगर शेअर गरीबाला श्रीमंत बनवू शकतो. इतकेच नव्हे तर काही शेअर छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मालामाल करू शकतात. मात्र शेअर बाजारात जोखीम भरपूर आहे. अर्थात गुंतवणुकीचे हे सूत्रच आहे की जितका जास्त परतावा तितकी जास्त जोखीम असते.

प्रत्येकाला शेअर बाजारातून होणारी तुफान कमाई आणि संपत्ती निर्मितीचे गुंतवणूकदारांना आकर्षण असते. शेअर बाजारातील चढउताराच्या वातावरणातदेखील काही शेअर्स तुफानी परतावा देतात. असाच एक मल्टीबॅगर शेअर आहे ज्याने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल या कंपनीचा हा शेअर आहे.

शेअर बाजारात अशाही काही कंपन्या आहेत, आपल्या गुंतवणूकदारांना वेळोवेळी बोनस देत असतात. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल ही कंपनीही अशाच काही कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी गेल्या काही वर्षांत एकदा नव्हे तर अनेक वेळा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले आहेत. विशेष म्हणजे या कंपनीने 2012 पासून आतापर्यंत तब्बल 6 वेळा आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, या कंपनीने आतापर्यंत आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना तब्बल 102,525 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

कंपनीने ऑगस्टमध्ये आपल्या योग्य शेअरधारकांना नफा वाटला आहे. यापूर्वी कंपनीने ऑक्टोबर 2018, जुलै 2017, जुलै 2015, डिसेंबर 2013 आणि ऑक्टोबर 2015 मध्येही आपल्या गुंतवणूकदारांना बोनस दिला होता. तसेच, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 17,712 कोटी रुपयांची कमाई केली होती. यातून कंपनीने 141 कोटी रुपये कमावले.

ही कंपनी 1 जानेवारी 1999 रोजी NSE वर 0.12 रुपयांना लिस्ट झाली होती. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये बरेच चढ-उतार बघायला मिळाले. 5 वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारंनी या कंपनीच्या स्टॉकवर विश्वास ठेवला त्यांना सध्या सुकसानीचा सामना करावा लागत आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 42 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल या कंपनीची राष्ट्रीय शेअर बाजारात म्हणजे एनएसईवर 1 जानेवारी 1999 ला नोंदणी झाली होती. त्यावेळेस या कंपनीचा शेअर फक्त 12 पैसे प्रति शेअर इतका होता. सध्या हा शेअर 125 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.

गेल्या काही वर्षांत या शेअरने मोठे चढउतार नोंदवले आहेत. त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी ज्यांनी यात गुंतवणूक केली त्यांनाच चांगली कमाई करता आली आहे. गुंतवणुकदारांना संवर्धन मदरसन इंटरनॅशनलच्या शेअरने दिला आहे. या कंपनीने गुंतवणुकदारांना फक्त छप्परफाड परतावा दिला इतकंच नाही तर तब्बल 6 वेळा बोनस शेअर देत गुंतवणुकदारांची संपत्ती कित्येक पटींनी वाढवली आहे.

आतापर्यंत संवर्धन मदरसन इंटरनॅशनलने आपल्या गुंतवणुकदारांना 6 वेळा बोनस शेअर दिले आहेत. बोनस शेअर म्हणजे गुंतवणुकदारांना त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या शेअरच्या पटीत काही आणखी शेअर कंपनीकडून मोफत दिले जातात. परिणामी गुंतवणुकदारांच्या शेअरच्या संख्येत पटीने वाढ होते. मात्र मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय घटकांच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठे चढउतार दिसून येत आहेत. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी मोठे हेलकावे खाताना दिसत आहे.

Share Market Investment Return Stock Money

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कुतूहलापोटी मोबाईलवर चॅटिंग करणे अंगलट! डॉक्टर सापडला सेक्सटॉर्शनच्या सापळ्यात

Next Post

पोलिस बनून आले… डोळ्यात मिरचीपूड फेकली… तब्बल २ कोटींचे दागिने लांबवले… असे घडले दरोड्याचे नाट्य

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

पोलिस बनून आले... डोळ्यात मिरचीपूड फेकली... तब्बल २ कोटींचे दागिने लांबवले... असे घडले दरोड्याचे नाट्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011