इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे अतिशय जोखमीचे आहे, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, जर तुम्ही नियोजनपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक केली तर तुमची प्रचंड भरभराट होऊ शकते. अशाच एका शेअर विषयी आपण जाणून घेणार आहोत.
1980 मध्ये ज्यांनी विप्रोच्या शेअर्समध्ये अवघ्ये 10 हजार रुपये गुंतवले असते तर आज तुम्ही चक्क ८९९ कोटी रुपयांचे मालक बनले असते. हे वाचून तुमचा विश्वास बसत नाहीय ना. तर आता आपण विस्ताराने सर्व काही समजून घेऊ.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 42 वर्षांपूर्वी म्हणजे 1980 मध्ये विप्रोच्या शेअर्समध्ये फक्त 10 हजार रुपये गुंतवले असतील आणि आजपर्यंत तो या शेअरमध्ये राहिला असेल तर तो आजच्या तारखेला अब्जाधीश झाला असता. विप्रोच्या शेअरची किंमत 1980 मध्ये सुमारे 100 रुपये होती, परंतु आता ती 468 रुपये आहे. कंपनी शेअर्सचे विभाजन करत राहिली आणि त्याचबरोबर बोनसही देत राहिली. याचा परिणाम असा झाला की ज्याने 1980 मध्ये 100 शेअर्स घेतले होते त्याच्याकडे एक पैसाही न गुंतवता 25536000 शेअर्स होतील. तथापि, क्वचितच असा कोणी गुंतवणूकदार असेल जो इतकी वर्षे एकाच स्टॉकमध्ये राहिला असेल.
अर्थतज्ज्ञ सांगतात की, शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी बहुतांश गुंतवणूकदारांमध्ये संयमाचा अभाव असतो. जर पैसे दीडपट वाढले तर आपण नफा वसूल करतो आणि तो कमी झाला तर तो विकून आपण स्टॉकमधून बाहेर पडतो. केवळ विप्रोच नाही तर तुम्ही आयशर, सिम्फनी, नॅटको फार्मा किंवा अजंता फार्मा किंवा इतर कोणत्याही चांगल्या स्टॉकमध्ये इतका वेळ दिला असता तर तुम्ही करोडपती झाला असता.
1980 मध्ये विप्रोच्या शेअर्समध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला विप्रो कंपनीचे 100 शेअर्स मिळाले. बोनस शेअर आणि स्प्लिट नंतर 100 शेअर्स वाढून 25536000 शेअर झाले. आता विप्रोच्या शेअरची किंमत 468 रुपये आहे. म्हणजेच आता त्या 10000 रुपयांची किंमत 468×25536000 = 8,99,19,36,000 झाली आहे.
विप्रो ही एक मोठी आयटी कंपनी आहे. तथापि, विप्रो देखील साबण आणि वनस्पती तेल व्यवसायात आहे. विप्रोची सुरुवात 1945 मध्ये महाराष्ट्रातील अमळनेर (जि. जळगाव) नावाच्या गावात झाली. या गावातील प्रत्येकजण आज करोडपती आहे. प्रत्येक कुटुंबाकडे विप्रो कंपनीचे शेअर्स आहेत. इथे विप्रो कंपनीचे काही शेअर्स मुलाचा जन्म होताच विकत घेतले जातात. या गावाला ‘सिटी ऑफ मिलियनेयर्स’ म्हणूनही ओळखले जाते.