मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड घडामोड सुरू आहे, परंतु काही शेअर्स असे आहेत की, ते सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. या पॅकेजिंग मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक म्हणजे कैसर कॉर्पोरेशन शेअर्सची किंमत होय .
या समभागाने या वर्षी 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या दरम्यान शेअर 2 रुपयांवरून 102 रुपयांपर्यंत वाढला. म्हणजेच, केवळ चार महिन्यांत, कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या समभागांनी त्यांच्या भागधारकांना 3,400 टक्क्यांहून अधिक चांगला परतावा दिला आहे.
या वर्षी 3 जानेवारी 2022 रोजी कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचे शेअर्स बीएसईवर 2.92 रुपये प्रति शेअर होते, जे आता चार महिन्यांत 102.40 रुपये झाले आहेत. या कालावधीत या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना 3,406.85 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात, हा स्टॉक 40.85 वरून 102.40 रुपयांपर्यंत वाढला. म्हणजेच या समभागाने एका महिन्यात 150.67 टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉक 21.40 टक्के वाढला आहे.
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरच्या किमतीच्या पॅटर्ननुसार एखाद्या गुंतवणूकदाराने चार महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 2.92 रुपये दराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आतापर्यंत त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज ही रक्कम 35 लाख झाली असती. त्याचप्रमाणे महिन्याभरापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपये 40.85 रुपये प्रति शेअर या दराने गुंतवले असते तर आज ही रक्कम 2.50 लाख रुपये झाली असती.