इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजारांमध्ये काही वेळा पेनी स्टॉक सुद्धा गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात, याची अनेक उदाहरणे सध्याच्या काळात दिसून येतात. एका पेनी स्टॉकने उत्कृष्ट परतावा दिला आहे. हा हिस्सा बीसीएल इंडस्ट्रीजचा आहे. या कंपनीचे शेअर्स एके काळी 1 रुपये दराने मिळत होते, त्याने आता 470 रुपयांची पातळी ओलांडली आहे.
कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेले गुंतवणूकदार आणखी श्रीमंत झाले आहेत. कंपनी खाद्यतेल, वनस्पती तूप, बासमती तांदूळ आणि लिकर उत्पादनांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. बीसीएल इंडस्ट्रीजच्या समभागांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
लाखाचे झाले 4.7 कोटी
BCL Industries Limited चे शेअर्स 16 फेब्रुवारी 2001 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 1 रुपयाला उपलब्ध होते. 13 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 472.10 रुपयांवर बंद झाले. या काळात कंपनीच्या समभागांनी जबरदस्त परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 16 फेब्रुवारी 2001 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 4.7 कोटी रुपये झाले असते. या काळात एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असते, तर सध्या हे पैसे 47 लाख रुपये झाले असते.
2 वर्षात एवढी कमाई
बीसीएल इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी गेल्या 2 वर्षातही जबरदस्त परतावा दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 31.20 रुपयांच्या पातळीवर होते, जे 13 एप्रिल 2022 रोजी 472.10 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. एखाद्या व्यक्तीने 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक ठेवली असती, तर सध्या हे पैसे 15.13 लाख रुपये झाले असते. गेल्या 6 महिन्यांत बीसीएल इंडस्ट्रीजच्या समभागांनी गुंतवणूकदारांना सुमारे 83 टक्के परतावा दिला आहे. त्याचबरोबर या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या समभागांनी 49 टक्के परतावा दिला आहे.
बीसीएल इंडस्ट्रीजच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक 110 रुपयांचा आहे. त्याच वेळी, कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची उच्च पातळी 525 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 1140 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 564.8 कोटी रुपये होता आणि कंपनीचा नफा 24 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता.
(महत्त्वाची सूचनाः शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे जोखमीचे आहे. त्यामुळे विचार करुन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी)