मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – आजच्या काळात प्रत्येकालाच कमी वेळेत अधिक किंवा मोठ्या प्रमाणात पैसा मिळावा, असे वाटत असते. मात्र पैसा वाढवायचा असेल तेव्हा पेनी स्टॉकला पर्याय नाही. खरे म्हणजे पेनी स्टॉकमध्ये जास्त जोखीम आहे, परंतु त्यांनी मजबूत परतावा देखील दिला आहे. असाच एक पेनी स्टॉक सिक्वेंट सायंटिफिकचा आहे. याचे शेअर्स एका वेळी फक्त 48 पैसे होते, मात्र आता त्यांनी जोरदार परतावा दिला आहे. कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 33,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
10 ऑक्टोबर 2002 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर सिक्वेंट सायंटिफिकचे शेअर्स अवघ्या 48 पैशांवर होते. दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 161 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या समभागांनी 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 33,441 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 10 ऑक्टोबर 2002 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर ती रक्कम सध्याच्या घडीला 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
सिक्वंट सायंटिफिकच्या शेअर्सनी गेल्या 10 वर्षात सुमारे 1,135 टक्के परतावा दिला आहे. दि. 16 मार्च 2012 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 14.15 रुपये होते. 4 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 161 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने 16 मार्च 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि त्याची गुंतवणूक तशीच ठेवली असेल, तर आजच्या तारखेनुसार पैसे 11.37 लाख रुपयांच्या जवळ आले असते.
विशेष म्हणजे या कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 336.40 रुपये आहे. त्याच वेळी, समभागांचा 52 आठवड्यांचा नीचांक 144.95 रुपये आहे. सिक्वेंट सायंटिफिकचे मार्केट कॅप सुमारे 4,000 कोटी रुपये आहे.