मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गुंतवले १५ हजार आता झाले तब्बल १ कोटी; कोणता आहे हा तुफान शेअर? घ्या जाणून…

by India Darpan
सप्टेंबर 13, 2022 | 5:06 am
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. कधी शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात एकदम घसरतो, तर कधी सावरत पुन्हा विक्रमाकडे झेपावतो. या परिस्थितीत नेमक्या कोणत्या शेअरवर आपले लक्ष असले पाहिजे, याबाबत अनेक तज्ज्ञ वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. तसेच, नेमक्या कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, असाही प्रश्न गुंतवणूकदारांना पडलेला असतो. मात्र, आज आपण एका तुफान शेअरची माहिती घेणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे.

सुमारे दोन दशकांत गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये हॅवेल्स इंडियाचे नाव समाविष्ट आहे. सन २००१ पासून आता या मल्टिबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना ७२,९२६.४६ टक्के इतका चांगला परतावा दिला आहे. हॅवेल्स इंडियाचे शेअर्स २३ मार्च २००१ रोजी १.८९ रुपयांना सूचीबद्ध झाले. मंगळवार, दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी हॅवेल्सचे शेअर्स NSE वर रु. १,३८०.२० वर बंद झाला. आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ६२ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचे बाजार भांडवल ८६.३५ हजार कोटी रुपये आहे आणि ती एक लार्ज-कॅप कंपनी आहे.

सुमारे ६४ वर्षापूर्वी सन १९५८ मध्ये सुरू झालेली कंपनी घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी घरगुती उपकरणे, प्रकाश उपकरणे, एलईडी लाइटिंग, पंखे, मॉड्यूलर स्विचेस आणि वायरिंग अॅक्सेसरीज, वॉटर हीटर्ससह अनेक उत्पादनांची निर्मिती करते. हॅवेल्स इंडियाचे शेअर्स गेल्या एका महिन्यात ५.८२ टक्क्यांनी वधारले.
गेल्या ६ महिन्यांत या समभागाने गुंतवणूकदारांना २८ टक्के परतावा दिला आहे. हॅवेल्सचा स्टॉक एका वर्षात ४.४२ टक्क्यांनी घसरला आहे. आतापर्यंत हॅवेल्स इंडियाच्या शेअर्सने लिस्ट झाल्यापासून गुंतवणूकदारांना ७२,९२६.४६ टक्के परतावा दिला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने २३ मार्च २००१ रोजी हॅवेल्स इंडियाच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आजपर्यंत कायम ठेवले असतील तर आज त्याचे गुंतवणुकीचे मूल्य ७.२९ कोटी रुपये झाले आहे. एवढेच नाही तर २३ मार्च २०२१ रोजी जर एखाद्या गुंतवणूकदाराने फक्त १५ हजार रुपये गुंतवले असते तर आज तो करोडपती झाला असता आणि त्याचे १५ हजार रुपये १.०९ कोटी रुपये झाले असते.

महत्वाचे म्हणजे गेल्या पाच वर्षात या समभागाने १८२ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी हॅवेल्स इंडियाच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर तो आज ३.८२ लाख रुपयांचा मालक झाला असेल. आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत Havells India Limited चा नफा ३.४७ टक्क्यांनी वाढून २४२.४३ कोटी झाला. तसेच मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा २३४.३ कोटी रुपये होता. त्याचप्रमाणे कंपनीचा वार्षिक महसूल देखील गत आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत २,५९८.२ कोटी रूपयांच्या तुलनेत ६२.८ टक्के वाढून रु. ४,२३०.१ कोटी रूपये झाला आहे.

Share Market Investment Return Money

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विचार पुष्प – हे आपण ओळखले का…

Next Post

चित्रपटगृहात पुन्हा एकदा “झुकेगा नही साला”; ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने घेतले इतके कोटी

India Darpan

Next Post
pushpa

चित्रपटगृहात पुन्हा एकदा "झुकेगा नही साला"; 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतले इतके कोटी

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011