इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या शेअर बाजारात या वर्षी बरेच चढ-उतार होत आहेत. सन 2022 मध्ये सेन्सेक्समध्ये आतापर्यंत 8.49 टक्के घसरण झाली आहे. परंतु या कठीण काळात, असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये असाही एक स्टॉक आहे, ज्याने अवघ्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 3000 टक्के परतावा दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ज्याने या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याला आजच्या काळात किती परतावा मिळाला असेल? त्या कंपन्यांविषयी जाणून घेऊ या…
कॅशर कॉर्पोरेशन :
कॅशर कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये यावर्षी 3000 टक्केची उसळी दिसून आली आहे. जानेवारी 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 3 रुपये होती. तो आजच्या काळात 93 रुपयांपर्यंत वाढला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ज्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, त्याचा परतावा आज 30 लाख रुपये झाला असेल.
सेल मॅन्युफॅक्चरिंग :
या वर्षी जानेवारीमध्ये सेल मॅन्युफॅक्चरिंगच्या एका शेअरची किंमत 49 रुपये होती. तो आता 965 रुपयांच्या पातळीवर गेला आहे. या समभागाने या वर्षी गुंतवणूकदारांना 2000 टक्के परतावा दिला आहे. या समभागाने अवघ्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे 1 लाखाचे19.69 लाख रुपये केले आहेत.
महत्त्वाची सूचना – शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे अतिशय जोखमीचे असते. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. विचारपूर्वकच गुंतवणूक करावी
Share Market Investment Return Money